कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी सांगली जिल्ह्यातील ४० गावे कर्नाटकात घेणारं असल्याचे भाष्य काही दिवसांपूर्वी केले होते. यामुळे महाराष्ट्र-कर्नाटक सीमावादाने पुन्हा एकदा डोके वर काढले होते. या पार्श्वभूमीवर अमित शहा यांनी दोन्ही राज्यातील मुखमंत्र्याची एकत्र बैठक घेऊन शांत राहण्याचे आवाहन केले होते. तसेच हा वाद सर्वोच्च न्यायालयात सुरू असून याबाबतचा निर्णय तिथेच होईल असे ही दोन्ही राज्यात सांगण्यात आले होते.
कोरोनाने घातले थैमान! राज्यातील अनेक प्रसिद्ध मंदिरात आजपासून मास्क सक्ती
दरम्यान कर्नाटकच्या ( Krnataka) विधानसभेत एक ठराव मंजूर झाल्याने नुकताच शांत झालेला हा वाद नव्याने पेट घेतोय. कर्नाटकच्या विधानसभेत महाराष्ट्राला एकही इंच जागा न देण्याचा ठराव मंजूर झाला आहे. या ठरावानंतर महाराष्ट्र सरकार ( Maharashtra Government) काय भूमिका घेणार अथवा काय प्रतिक्रिया देणार याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.
धक्कदायक! सिक्कीममध्ये लष्कर गाडीचा अपघात होऊन १६ भारतीय जवानांचा मृत्यू
राजकीय वर्तुळात देखील सीमावादावरून बराच गोंधळ सुरू असून कर्नाटक सरकारच्या या निर्णयामुळे महाराष्ट्रात नागपूर येथे सुरू असणाऱ्या हिवाळी अधिवेशनात देखील मोठा गोंधळ होणार आहे. आता देखील सीमावादावरून सत्ताधारी व विरोधक यांच्यात टीका युद्ध सुरूच आहे. अगामी काळात कर्नाटक महाराष्ट्र सीमावादावर सर्वोच्च न्यायालय काय निर्णय देईल व त्यावर महाराष्ट्र व कर्नाटक सरकारची काय प्रतिक्रिया असेल हे देखील पाहण्यासारखं असणार आहे.