Site icon e लोकहित | Marathi News

Maharashtra Assembly Session । विधिमंडळात राष्ट्रवादीचे कार्यालय जैसे थे, अजित पवार आणि शरद पवार गट एकत्र बसणार?

Will the NCP's office in the legislature, Ajit Pawar and Sharad Pawar group sit together?

Maharashtra Assembly Session । आजपासून पावसाळी अधिवेशनाला (Assembly Session) सुरुवात होणार आहे. दरम्यान अजित पवार (Ajit Pawar) यांनी बंड केल्यानंतर त्यांचे हे पहिले अधिवेशन असणार आहे. या अधिवेशनात अनेक घोषणा होण्याची शक्यता आहे. परंतु या अधिवेशनात सत्ताधारी विरोधकांवर भारी पडणार की विरोधक सत्ताधाऱ्यांवर भारी पडणार हे पाहणं महत्त्वाचे ठरणार आहे. वेगवेगळे मुद्दे या अधिवेशनात गाजू शकतात. (Latest Marathi News)

अधिवेशनाला आजपासून सुरूवात, संपूर्ण महाराष्ट्राचे ‘या’ मुद्द्यांकडे लक्ष

सर्वात महत्त्वाचे म्हणजे जरी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (NCP) सत्तेत असला तरी विरोधक म्हणून राष्ट्रवादीचे नेते असणार आहेत. त्यामुळे अजूनही विधिमंडळातील राष्ट्रवादी कार्यालयात कोणताच बदल केला नाही. या पक्ष कार्यालयात शरद पवार (Sharad Pawar) यांचा फोटो लावला आहे. दरवाजावर विधानसभा प्रतोद अनिल पाटिल यांच्याच नावाची पाटी पाहायला मिळत आहे.

Rohit Pawar | धक्कादायक! रोहित पवारांचे पुण्यातील कार्यालय जाळण्याचा प्रयत्न

अजित पवारांनी बंड केल्याने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात दोन गट पडले आहेत. पक्षातील अनेक कार्यकर्ते आणि नेत्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांना पाठिंबा दिला आहे तर अनेकांनी अजित पवार यांना पाठिंबा दिला आहे. त्यामुळे पक्षाच्या विधिमंडळातील कार्यालयात कोणताच बदल करण्यात आला नाही. त्यामुळे आता दोन्ही गटाचे नेते एकत्र बसणार का? हे पाहणं महत्त्वाचे ठरेल.

ब्रेकिंग! अधिवेशन सुरु होण्यापूर्वी मंत्रिमंडळात मोठा बदल, एकनाथ शिंदे यांच्याकडे असणारी खाती दिली इतर मंत्र्यांना

दरम्यान, अधिवेशनात महिलांवर होणारे अत्याचार, कायदा आणि सुव्यवस्थेचे प्रश्न, कांदा उत्पादक शेतकऱ्यांचे अनुदान, शेतमालाचे घसरणारे भाव तसेच अतिवृष्टीने ग्रस्त शेतकऱ्यांचा मुद्दा, राज्यात घडणाऱ्या जातीय दंगली आणि मंत्र्यांवर असणारे भ्रष्टाचाराचे आरोप हे महत्त्वाचे मुद्दे गाजू शकतात.

पावसाचा कहर सुरूच! कुठे वाहने बुडाली, तर कुठे रस्त्याला भले मोठे खड्डे पडले

Spread the love
Exit mobile version