केंद्र सरकार (Central Govt) शेतकऱ्यांना, गोरगरीब जनतेला आर्थिक सहाय्य मिळावे म्हणून अनेक वेवेगळ्या योजना राबवत असते. यामध्ये केंद्र सरकारने मागच्या बऱ्याच दिवसांपासून गोरगरिबांसाठी प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजना चालू केली आहे. या योजनेअंतर्गत गोरगरिबांना ५ किलो रेशन मोफत दिले जात असे. या योजनेची शेवटची तारीख ३१ डिसेंबर आहे. मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदी या योजनेची मुदतवाढ करण्याचा विचार करतील अशी माहिती समोर आली आहे.
“मी भाषण करत नव्हतो”, निलंबनानंतर जयंत पाटलांची प्रतिक्रिया
सरकारकडे पुरेसा धान्यसाठा उपब्ध असल्याचे देखील केंद्रीय मंत्री शोभा करंदलाजे (Shobha Karandlaje) यांनी याबाबत माहिती दिली. याबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी (Prime Minister Narendra Modi) यांच्या अध्यक्षतेखाली बैठक देखील होऊ शकते.
मोठी बातमी! जयंत पाटील यांचे निलंबन
याबाबत बोलताना केंद्रीय मंत्री करंदलाजे यांनी सांगितले की, ” कोरोना (Corona) रुग्णांमध्ये पुन्हा वाढ होताना दिसत आहे. ही योजना डिसेंबरपर्यंत आहे. पण ती पुढे चालू ठेवण्याबाबतबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी निर्णय घेतील.