दुधाचे दर पाच ते सहा रुपयांनी वाढणार? वाचा सविस्तर

Will the price of milk increase by five to six rupees? Read in detail

मुंबई : राज्यात महागाई प्रचंड वाढत चालली आहे त्यामध्येच आता दिवाळीच्या तोंडावर तेल, डाळी, दूध यांचे दर गगनाला भिडले आहेत. लंम्पी आजाराने धुमाकूळ घातल्यामुळे पशुपालकांचे दूध (Milk) उत्पादन कमी झाले आहे. यामध्येच आता दुधाचे दर वाढले असता जानेवारी ते मार्च दरम्यान दुधाचे दर आणखी 5 ते 6 रुपयांनी वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

‘या’ जिल्ह्यात घडला धक्कादायक प्रकार, नुकसानीचे पंचनामे करण्यासाठी शेतकऱ्यांकडे पैशाची मागणी

देशातील अनेक राज्यामध्ये लम्पी आजाराने धुमाकूळ घातला त्यामुळे दूध उत्पादनावर त्याचा परिणाम होऊन. दुधाची टंचाई निर्माण झाली आहे. त्यामुळे जानेवारी ते मार्चदरम्यान दुधाचे दर ५ ते ६ रुपयांनी वाढण्याची शक्यता आहे.

दरम्यान दिवाळीच्या मुहूर्तावर दुधाच्या दरात वाढ झाली आहे. त्याचबरोबर हे दर आणखी वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे. इंडियन डेअरी असोसिएशनचे संचालक चेतन नरके यांनी जानेवारी ते मार्च दरम्यान देशात दुधाची टंचाई निर्माण होऊ शकते असा अंदाज व्यक्त केला आहे.

राज्यात पावसाचा कहर, अनेक गोरगरिबांचे संसार उघड्यावर

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *