Ayodhya Ram Mandir । मोठी बातमी! अयोध्येतील प्राणप्रतिष्ठेनिमित्त दिलेली सार्वजनिक सुट्टी रद्द होणार?

Ayodhya Ram Mandir

Ayodhya Ram Mandir । संपूर्ण देशासाठी २२ जानेवारी हा दिवस महत्त्वाचा असणार आहे. कारण राज्यात येत्या सोमवारी म्हणजेच २२ जानेवारीला अयोध्येत प्राणप्रतिष्ठा सोहळा (Ram Mandir) संपन्न होत आहे. संपूर्ण देशात या सोहळ्याचा उत्साह पाहायला मिळतोय. अयोध्येमध्ये या सोहळ्याची तयारी अंतिम टप्प्यात आली आहे. सरकारने अयोध्येतील प्राणप्रतिष्ठेनिमित्त सार्वजनिक सुट्टी दिली आहे. (Latest marathi news)

Ajit Pawar । ‘बाबांनो तुम्ही दोन किंवा एक अपत्यावर थांबा’, अजित पवारांनी भरसभेत केली विनंती

पण आता ही सुट्टी रद्द होण्याची शक्यता आहे. कारण राज्य सरकारच्या (State Govt) या निर्णयाविरोधात कायद्याच्या विद्यार्थ्यांकडून न्यायालयात धाव घेण्यात आली आहे. अशाप्रकारची सार्वजनिक सुट्टी (Public holiday) फक्त देशभक्तीच्या निमित्तानं देता येते, पण एका धार्मिक कार्यक्रमासाठी अशा पद्धतीनं सुट्टी देणे हे चुकीचं आहे. या सुट्टीमुळे शैक्षणिक आणि प्रशासकीय कामांचे नुकसान होईल असा दावा या याचिकेत केला आहे.

Sharad Pawar । शरद पवारांनी सांगितला थरकाप उडवणारा किस्सा, म्हणाले; पाकिस्तानच्या गोळीबारातून आम्ही थोडक्यात बचावलो

इतकेच नाही तर या याचिकेत सुट्टीकालीन खंडपीठानं यावर तातडीनं सुनावणी करावी, अशी मागणी केली आहे. आज या याचिकेवर सकाळी साडेदहा वाजता सुनावणी होईल. यावर आता न्यायालय काय निर्णय घेते, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल. दरम्यान, उद्या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्या हस्ते रामलल्लांची प्राणप्रतिष्ठा होणार आहे.

Eknath Shinde । मराठा आरक्षणाबाबत एकनाथ शिंदे यांचे नवे आदेश

Spread the love