शिंदे गटातील आमदारांच्या अपात्रतेच्या मुद्द्यावर मागच्या काही दिवसापासून सर्वोच्च न्यायालयामध्ये (Supreme Court) सुनावणी सुरु आहे. यामध्ये शिवसेनेचा व्हीप मोडल्यामुळे शिंदे गटातील आमदारांना अपात्र ठरवावे अशी मागणी ठाकरे गटाकडून करण्यात आली आहे.
त्यामुळे जर हे आमदार अपात्र ठरले तर राज्याच्या राजकारणात काय घडणार? याविषयी अनेक तर्क-वितर्क लावले जात असून राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. दरम्यान उद्धव ठाकरे यांनी एक मोठं वक्तव्य केलं होत. उद्धव ठाकरे म्हणाले होते, “पुण्यात पोटनिवडणुकीत आपल्याला राष्ट्रवादीला विजयी करावंच लागेल. विधानसभेची मध्यावधी निवडणूक लागेल किंवा लागू शकेल असा माझा अंदाज आहे. कारण सर्वोच्च न्यायालयात आमदारांच्या अपात्रतेच्या मुद्द्यावर सुनावणी सुरू आहे. त्यामुळे जर आमदार अपात्र ठरले तर आपल्या राज्यात मध्यावधी लागू शकतात”, असं उद्धव ठाकरे म्हणाले आहे.
उद्धव ठाकरेंच्या या विधानानंतर शिंदे गटाचे नेते उदय सामंत यांनी प्रतिक्रिया दिली आहे. उदय सामंत म्हणाले की, ” आमच्याकडे १७० आमदारांचं बहुमत आहे. त्यामुळे राज्यात मध्यावधी निवडणुका लागण्याची काहीही शक्यता नाही. त्याचबरोबर १५ ते २० आमदार आमच्या संपर्कामध्ये आहेत असं मोठं वक्तव्य उदय सामंत यांनी केलं आहे. त्यामुळे राज्याच्या राजकारणात पुन्हा एकदा राजकीय भूकंप होणार का? अशा चर्चांना उधाण आले आहे. एका वृत्तवाहिनीशी संवाद साधताना उदय सामंत यांनी हे वक्तव्य केले आहे.
कांद्याला भाव मिळत नसल्याने शेतकऱ्याने उचललं टोकाचं पाऊल, कांदा पिकावर फिरवला ट्रॅक्टर; पाहा VIDEO