पुण्याचे खासदार गिरीश बापट (Girish Bapat) यांचे काल निधन झाले आहे. त्यांनी वयाच्या 73 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला आहे. त्यांच्या निधनाने राजकीय क्षेत्रातून हळहळ व्यक्त केली जात आहे. यामध्येच आता पुण्यात खासदारकीच्या रिक्त झालेल्या जागेवर पोटनिवडणूक पोटनिवडणूक होणार का? अशा चर्चा सुरु झाल्या आहेत.
अन् त्याने चक्क सापाच्या अंगावर पाणी ओतलं; पुढे घडलं असं की…, पाहा थरकाप उडवणारा Video
कायदेतज्ज्ञ उल्हास बापट म्हणाले, १९५१ सालचा 151 A लोकप्रतिनिधी कायद्यानुसार जर खासदारकीचा कालावधी एक वर्षाचा राहिला असेल तर निवडणूक घ्यावी लागते. गिरीश बापट यांच्या खासदारकीचा विचार केला तर एक वर्षापेक्षा जास्त काळ आहे. त्यामुळे ही निवडणुक घ्यावी लागणार आहे. आणि ही निवडणुक सहा महिन्याच्या आत घ्यावी लागते. असं उल्हास बापट म्हणाले आहेत.
राखीनं उडवली मलायकाची खिल्ली, व्हिडिओ व्हायरल
त्यामुळे आता बापट यांच्या जागेसाठी कोण निवडणूक लढवणार अशा चर्चा रंगल्या आहेत. दरम्यान, काल गिरीश बापट यांच्या अंतिम दर्शनासाठी पुणेकरांनी तुफान गर्दी केली होती. त्याचबरोबर त्यांच्या अंतिम दर्शनासाठी अनेक बडे नेते देखील उपस्थित होते.