उद्धव ठाकरेंना मोठा धक्का बसणार? बड्या नेत्याचा खळबळजनक दावा

Will Uddhav Thackeray get a big shock? Sensational claim of a great leader

मागील वर्षी एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी शिवसेनेत (Shivsena) बंड करून भाजपसोबत (BJP) युती करून मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. उद्धव ठाकरे यांच्या अत्यंत जवळच्या सहकाऱ्यांनी त्यांची साथ सोडून भाजपची साथ दिली. या घटनेला वर्ष झाले तरी अजूनही उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या गटातून नेते बाहेर पडत आहेत. त्यामुळे त्यांना अजूनही धक्क्यांवर धक्के बसत आहे. अनेक नेते ठाकरे गट सोडून इतर पक्षात जास्त असल्याने उद्धव ठाकरेंची चिंता वाढू लागली आहे. (Latest Marathi News)

Rain in Maharashtra । राज्यातील काही भाग तहानलेलाच! पावसाअभावी शेतकऱ्यांवर घोंगावतंय दुबार पेरणीचं संकट

शिंदे गटाचे नेते मंत्री उदय सामंत (Uday Samantha) यांनी याबाबत एक मोठा गौप्यस्फोट केला आहे. ठाकरे गटातील आणखी 4 आमदार आमच्या संपर्कात असल्याचा दावा त्यांनी केला आहे. दरम्यान मागील दोन महिन्यांपूर्वीही त्यांनी ठाकरे गटाचे सहा आमदार शिंदे गट येणार असून त्यापैकी आता 2 आमदार शिवसेना शिंदे गटात आले आहे. त्यांच्या या दाव्यामुळे ते ४ आमदार कोण याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगू लागली आहे.

नाशिक येथील ‘त्या’ अपघातावर अजित पवारांनी दिली प्रतिक्रिया, म्हणाले…

राज्यात एकीकडे मंत्रिमंडळाच्या विस्ताराची (Expansion of Cabinet) चर्चा सुरु आहे. तर दुसरीकडे उदय सामंत यांनी ठाकरे गटाला खिंडार पडणार असल्याचा दावा केला आहे. त्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. जर राज्यात ठाकरे गटाची अशीच गळती सुरु राहिली तर उद्धव ठाकरेंना आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत खूप मोठा फटका बसणार यात काही शंकाच नाही.

Delhi Crime । महिलेच्या शरिराचे तुकडे करून फेकले पुलाजवळ, धक्कादायक घटनेने दिल्ली पुन्हा हादरली

Spread the love