
सध्या सोशल मीडियाचा वापर मोठ्या प्रमाणात होत आहे. फक्त तरुण मुलेच नाही तर वयस्कर लोक व लहान मुले देखील सोशल मीडियाच्या ( Social Media) विळख्यात अडकले आहेत. यातून अनेक चुकीच्या घटना घडत आहेत. नुकताच पुण्यात एक प्रकार समोर आला आहे. ज्यामध्ये अवघ्या 14 वर्षाच्या अल्पवयीन मुलाने इन्स्टाग्राम स्टोरीला मुलीचा फोटो टाकून माझ्याशी लग्न करशील का ? असे विचारले आहे. हा धक्कादायक प्रकार लक्षात येताच या मुलाचे पालक सुद्धा चांगलेच चक्रावून गेले आहेत.
शेतकऱ्याने धरले अधिकाऱ्याचे पाय; म्हणाला अडचण दूर करा अन्यथा…
त्याच झालं अस की, या मुलाने त्याच्याच वर्गातल्या मुलीला माझी मैत्रीण होशील का ? असे विचारले होते. यावेळी त्या मुलीने नकार दिल्यानंतर त्याने माझी मैत्रीण हो अथवा तुला उचलून घेऊन जाईल असे म्हंटले होते. मात्र, या मुलीने यावर उत्तर न दिल्याने या बहद्दराने त्या मुलीचा फोटो आपल्या इन्स्टाग्राम स्टोरीला ( Instagram Story) टाकत, माझी बायको होशील का ? असा प्रश्न विचारला. या नंतर संबंधित मुलीच्या मैत्रिणीने तिला या इन्स्टाग्राम स्टोरी बद्दल माहिती दिली. यावेळी मुलीने आपल्या घरी आईला ही गोष्ट सांगितली. अशी माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक अरविंद गोकुळे यांनी दिली आहे.
बिग ब्रेकिंग! चीनमध्ये पुन्हा कोरोनाचा उद्रेक; ‘या’ ठिकाणी लॉकडाऊनही केलं
हा सर्व प्रकार लक्षात आल्यानंतर मुलीच्या आईने स्वतः पोलीस स्टेशनमध्ये जाऊन रीतसर तक्रार नोंदविली आहे. सध्या या मुलाची परीक्षा सुरू आहे. यामुळे परीक्षा संपल्यानंतर या मुलाला बाल कल्याण समितीसमोर सादर करण्यात येणार आहे. असे पोलिसांनी सांगितले आहे. एवढया लहान वयात या मुलाने असे पाऊल उचल्याने शिक्षक, पालक व पोलीस सुद्धा थक्क आहेत.
डिझेलचा टँकर व ट्रॅक्टरचा भीषण अपघात; तब्बल दीड तास सुरू होता अग्नितांडव