बॉलिवूड अभिनेत्री आथिया शेट्टी (Athiya Shetty) व क्रिकेटपटू के एल राहुल नुकतेच लग्न बंधनात अडकले आहेत. दरम्यान विविध सेलेब्रिटींकडून त्यांच्या लग्नात देण्यात आलेल्या भेटवस्तूंबाबत सगळीकडे चांगलीच चर्चा रंगली आहे. अशातच के एल राहुलने ( K.L. Rahul) आपल्या चाहत्यांना एक मोठी बातमी दिली आहे. या पार्श्वभूमीवर त्याने नुकताच एक व्हिडिओ त्याच्या सोशल मीडिया अकाउंट वरून शेअर केला आहे.
“भसाडा आवाज आणि…”, अमृता फडणवीसांचे नवीन गाणे रिलीज होताच नेटकरी संतापले
आपल्या लग्नाला चार दिवस पूर्ण होताच आपल्या पत्नीला वेळ देऊन हनिमूनला जाण्याऐवजी देशाला समोर ठेवत खेळाला महत्त्व दिले आहे. लग्नानंतर त्याने लगेचच ऑस्ट्रेलिया विरुध्दच्या कसोटी सामन्यासाठी (Austrelia Test Series) सराव सुरू केला आहे. लग्नामुळे त्याने न्यूझीलंड विरुद्ध सुरू असणाऱ्या क्रिकेट मालिकेतून ब्रेक घेतला होता. मात्र आता पुन्हा एकदा तो खेळण्यासाठी सज्ज होत आहे. लग्नानंतर राहुलचे हे जोरदार कमबॅक असणार आहे.
Video: रणबीर कपूरने फेकून दिला चाहत्याचा फोन; संतापलेले नेटकरी म्हणाले हा कोणता माज?
भारतीय क्रिकेट संघाचा टॉप ऑर्डर बॅट्समन म्हणून के एल राहुलला ओळखले जाते. 30 वर्षीय राहुलने आतापर्यंत भारतीय क्रिकेट संघासाठी मोठे योगदान दिले आहे. त्याने 45 कसोटी सामने खेळले असून त्यामध्ये त्याने 34.3 च्या सरासरीने 2604 धावा काढल्या आहेत. इतकंच नाही तर त्याच्या बॅटमधून 7 शतके आणि 13 अर्धशतके झळकली आहेत.