Site icon e लोकहित | Marathi News

“…त्याशिवाय सरकार वठणीवर येणार नाही”, अजित पवार कडाडले

"…Without that the government will not come to power", Ajit Pawar snapped

अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा शेवटचा आठवडा असून विरोधक सत्ताधाऱ्यांवर टीका करण्यासाठी एकही संधी सोडत नाहीत. कोणत्या ना कोणत्या मुद्द्यावरून विरोधक सरकारला घेरत असतात. दरम्यान, मागच्या काही दिवसापासून राज्यात अवकाळी पावसाने थैमान घातले आहे. यामुळे शेतकऱ्यांच्या शेतपिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे. शेतकऱ्यांच्या नुकसानीचे पंचनामे लवकरात लवकर करू असे आश्वासन सरकारने दिले होते. मात्र तरीदेखील पंचनामे झाले नाहीत. याच मुद्द्यावरून विरोधकांनी आक्रमक भूमिका घेतली आहे.

व्हॉट्सअ‍ॅपने आणले भन्नाट फीचर! आता फोटोमधून कॉपी करता येणार टेक्स्ट

विधानसभेमध्ये विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी अवकाळी पावसाने शेतकऱ्यांचे झालेलं नुकसान आणि कर्मचाऱ्यांच्या संपावरून सरकारला चांगलंच सुनावलं आहे. भर विधानसभेत अजित पवार भडकल्याचे चित्र दिसत आहे.

आजोबा जोमात पाहणारे कोमात! आजोबांनी हात सोडून गाडीवर केले जबरदस्त स्टंट; पाहा अंगावर काटा येणारा Video

अधिवेशन चालू होताच अजित पवार म्हणाले, “अधिवेशनाचा शेवटचा आठवडा सुरू झाला आहे. तरीही कर्मचाऱ्यांच्या संपाबाबत कोणताच ठोस निर्णय निघालेला नाही. त्याचबरोबर, गारपीट, अवकाळी पावसाने शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान देखील झाले आहे. तरीदेखील याचे पंचनामे करायला कुणी नाहीये.” असं यावेळी अजित पवार म्हणाले आहेत.

सैराट चित्रपटाबाबत नागराज मंजुळे यांनी केला मोठा खुलासा म्हणाले, अर्चीच्या भूमिकेसाठी रिंकू राजगुरूला नव्हे तर…

त्याचबरोबर कर्मचारी संपावर असल्यामुळे शाळा बंद आहेत. विद्यार्थ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. त्यामुळे विदर्भातील एका गावातील ग्रामस्थांनी तर स्वतःच शाळा चालवण्याचा निर्णय घेतला आहे. अध्यक्ष महोदय तुम्ही आदेश काढले पाहिजेत, त्याशिवाय सरकार वठणीवर येणार नाही,” या शब्दांमध्ये अजित पवार यांनी सरकारला सुनावलं आहे.

धक्कादायक घटना! इंस्टाग्राम रिल्स बनविण्यासाठी कॉलेजच्या छतावर चढला अन् खाली पडून तरुणाचा दुर्दैवी मृत्यू

Spread the love
Exit mobile version