Devendra Fadanvis । खळबळजनक! देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यक्रमातच महिलेचा मृत्यू, धक्कादायक कारण समोर

Devendra Fadanvis

Devendra Fadanvis । केंद्रीय निवडणूक आयोग (Election Commission) कधीही निवडणुकीच्या तारखा जाहीर करू शकते. सर्व पक्ष निवडणुकांची तयारी करताना दिसत आहेत. भाजपदेखील निवडणुकीसाठी जोमाने तयारी करताना दिसत आहे. अशातच आता एक खळबळजनक घटना घडली आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा कार्यक्रम सुरु असताना एका महिलेचा मृत्यू झाला आहे. (Latest marathi news)

Bjp । भाजपला सर्वात मोठा धक्का! महिला नेता ठोकणार पक्षाला रामराम

भाजपकडून (BJP) नागपुरमध्ये नुकताच बांधकाम कामगारांसाठी शिबीराचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. पण या कार्यक्रमामध्ये एका वृद्ध महिलेचा मृत्यू झाला आहे. आयोजित कार्यक्रमाच्या सभागृहाबाहेर लाभार्थ्यांची गर्दी जमली. सभागृहामध्ये जाण्यासाठी सर्वांनी धाव घेतली. यावेळी मोठ्या प्रमाणात चेंगराचेंगरी झाली. यावेळी वृद्ध महिला खाली पडून त्यांच्या अंगावर इतर महिला पडून त्या देखील बेशुद्ध झाल्या.

Lok Sabha Elections । बिग ब्रेकिंग! अजितदादांची अमित शहांकडे लोकसभेसाठी ‘इतक्या’ जागांची मागणी

त्यांना तातडीने दवाखान्यात नेण्यात आले पण त्यांचा मृत्यू झाला. इतकेच नाही तर यावेळी 8 ते 10 वृद्ध महिला देखील जखमी झाल्या असल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. त्यामुळे या घटनेमुळे सगळीकडे संताप व्यक्त केला जात आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी देखील तातडीने घटनास्थळी धाव घेतली.

Sharad Pawar । लोकसभा निवडणुकीच्या पार्श्ववभूमीवर शरद पवार यांनी केली मोठी घोषणा!

Spread the love