Site icon e लोकहित | Marathi News

“महिला स्कुटी चालवत होती मागे लागले भटके कुत्रे, अन् पुढे घडलं की…” पाहा थरकाप उडवणारा Video

"Woman was driving a scooty and was followed by stray dogs, and what happened next..." Watch Shocking Video

सध्या सोशल मीडियावर (Social Media) एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये एका महिलेच्या स्कूटीमागे काही भटके कुत्रे लागल्याचं दिसत आहे. यावेळी ती महिला मागे लागलेल्या कुत्र्यांकडे लक्ष देत आहे. मात्र मागे लागलेल्या कुत्र्यांकडे लक्ष देण्याच्या नादात महिला समोर एका गाडीला धडकल्याचे आपल्याला पाहायला मिळत आहे.

मोठी बातमी! माजी अमेरिकन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना अटक

कुत्र्यांच्या दहशतीचा हा व्हिडीओ समोर आला असून सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. ही संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमऱ्यामध्ये कैद झाली आहे. हा व्हिडिओ 3 एप्रिल रोजी ‘पीटीआय’ या वृत्तसंस्थेच्या ट्विटर हँडलवरून पोस्ट करण्यात आला होता. यावेळी त्यांनी कॅप्शनमध्ये लिहिले की, “ओडिशातील बेरहामपूर शहरात भटके कुत्रे चावा घेतील या भीतीने एका महिलेने तिची स्कूटी रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या कारवर धडकवली. या घटनेत महिला आणि लहान मुलगा जखमी झाले आहेत” असे त्यांनी कॅप्शनमध्ये लिहिले आहे.

संदीप देशपांडे हल्ला प्रकरणात समोर आली धक्कादायक माहिती

हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. व्हिडीओल आतापर्यंत 4 लाख 70 हजारांहून अधिक व्ह्यूज आणि 1300 हून अधिक लाईक्स मिळाले आहेत. त्याचबरोबर नेटकरी देखील यावर वेगेवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत.

शिंदे गटातील महिलांकडून मारहाण झालेल्या रोशनी शिंदे यांनी दिली पहिली प्रतिक्रिया; म्हणाल्या…

Spread the love
Exit mobile version