परदेशी लोकांचे कायम भारतीय लोकांना अप्रूप असते. त्यातल्या त्यात महिलांचे तर फारच! या लोकांचे व्हिडिओ देखील प्रचंड व्हायरल होत असतात.फॉरेनची पाटलीन ( Foreignchi Patlin) या चित्रपटात परदेशी महिलेला शेतात काम करताना पाहताना लोक हरखून गेले होते. अगदी असाच एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय. यामध्ये एक परदेशी सून शेतात कांदा पेरत आहे.
शिंदे सरकारनं ऊस उत्पादकांना दिली मोठी खुशखबर
या व्हिडिओमध्ये एका परदेशी महिलेने भारतीय कपडे घातले आहेत व ती शेतात काम करत आहे. या महिलेने मोठे सिंदूर देखील लावलेले पहायला मिळते. या महिलेला काम करताना बघून एक व्यक्ती तिला प्रश्न विचारण्याची परवानगी मागते. यावर ही विदेशी महिला हिंदीमध्ये उत्तर देत होकार कळवते.
शाहरूखच्या चित्रपटाचे चक्क औरंगाबादमध्ये होणार शूटिंग; बिडकीन मधील ‘डीएमआयसी’त चाहत्यांची गर्दी
यानंतर या विदेशी महिलेला तू कुठून आली आहेस ?असा प्रश्न विचारला जातो. यावर ती मी जर्मनीची असून सध्या इथल्या शेतात कांदा लावतीये अस सांगते. यावर ती व्यक्ती “तुम्ही जर्मनीहून कांदा लावण्यासाठी भारतात आला आहात का ?” असा प्रश्न विचारते. यावर उत्तर देताना ती परदेशी महिला (Foreign woman) हसू लागते.
एमपीएससी पास नाही झाला तर आमदार, खासदार होता येतं – गोपीचंद पडळकर
या व्हिडिओमध्ये फक्त परदेशी महिलाच नाही तर तिची सासू देखील पहायला मिळते. व्हिडिओ दरम्यान या सुनेची सासू दूर उभी असून ती हसताना पहायला मिळत आहे. थेट जर्मनीहून कामासाठी आलेल्या या सुनेचा व्हिडिओ लोकांच्या चांगलाच पसंतीस उतरला आहे.
तांत्रिक बिघाडामुळे वायुदलाचे हेलिकॉप्टर बारामतीमधल्या गावात; अचानक उडाली खळबळ