श्रीगोंदा : तालुक्यातील सर्वात मोठी ग्रामपंचायत असलेल्या मांडवगण मध्ये ऐन पावसाळ्यात ग्रामपंचायतच्या गलथान कारभारामुळे भीषण पाणी टंचाई सुरू झालेली आहे. गावात नळाला 15-20 दिवसातून एकदाच पाणी ते पण पाणी अवेळी कोणत्याही वेळेला येते त्यामुळं मोलमजुरी करून काम करणाऱ्या महिलांचे मोठ्या प्रमाणात हाल होत असतात. महिला कामावर गेलेल्या असताना नळाला पाणी येते त्यामुळं वीस दिवसातून येणाऱ्या अवेळी पाण्यामुळे महिलांचे प्रचंड हाल होतात. तसेच नळाला आलेले पाणी हे कधी कधी अशुद्ध येते त्यामुळं काहींना त्वचेचे आजार सुद्धा होतात.
Government scheme । आनंदाची बातमी! ५०% अनुदानावर आजच करा शेळीपालन, काय आहे योजना? जाणून घ्या
ग्रामपंचायत ने सीना पाईपलाईन साठी दहा लाख रुपये खर्च करून जुनी पाईपलाईन चालू केली पण त्यातून काही दिवस पाणी आले. परत ती पाईपलाईन बंद पडली. नको तिथं ग्रामपंचायतने जनतेचे लाखो रुपये खर्च केलेले आहेत.उन्हाळ्यामध्येच पुढील पिण्याचे पाण्याचे नियोजन ग्रामपंचायत सत्ताधारी अन विरोधी सदस्य दोघानीही करायचे असते पण दोन्ही एकमेकांन वर आरोप करण्यात व्यस्त आहेत.पाणी टंचाई झाल्यावर ऐनवेळेला ग्रामपंचायत ला जनतेच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न आठवला तरी अजून त्यांच्याने कुठलीही ठोस कृती न झाल्यामुळे आज मांडवगण मधील महिला वर्गाने मोठ्या संख्येने ग्रामपंचायत वर हंडा मोर्च्या नेण्यात आला होता. मोर्चा मध्ये महिला तरुण वर्गाची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.
यावेळी ग्रामपंचायत ने जुने बंद पडलेले हातपंप त्वरित सुरू करून गावाला पाणीपुरवठा करण्यात यावा असे ग्रामस्थांच्या वतीने सांगण्यात आले. तसेच जोपर्यंत पाणी पुरवठा सुरळीत होत नाही तोपर्यंत ग्रामस्थांकडून कुठलीही पाणीपट्टी वसूल करू नये असे सांगण्यात आले. तसेच ग्रामपंचायत मध्ये दाखल्यांच्यासाठी विद्यार्थ्यांची कुठल्याही प्रकारची अडवणूक करू नये असे सांगण्यात आले.
Onion Rate । कांद्याचा पुन्हा वांदा.. ठेवला तर सडतोय अन् विकला तर भाव नाही
ग्रामपंचायत मधील ग्रामसेवक हा सत्ताधारी अन विरोधक यांच्यातील दुवा असतो त्याने दोघांना विचारात घेऊन गावाच्या विकासाचे कामे करायचे असतात पण मांडवगण ग्रामपंचायत मधील ग्रामसेवक श्री.गोळे गावाच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न आठ दिवसात सोडवला नाही तर ग्रामपंचायतला टाळे ठोकण्याचा इशारा संभाजी ब्रिगेड शेतकरी आघाडीचे प्रदेश उपाध्यक्ष संग्राम देशमुख यांनी दिला आहे.
धक्कादायक! राज्यातील 3500 गावे संपर्काविनाच, नाहीत ‘या’ सुविधा
गावच्या पिण्याच्या पाण्याच्या उपाययोजना साठी ग्रामसेवक,सत्ताधारी सदस्य, विरोधी सदस्य यांनी या उपाययोजना करायच्या असतात पण पाण्याचा प्रश्न सोडवण्यासाठी काय उपाय योजना करायच्या ही सांगण्याची वेळ पत्रकार श्री.राजेंद्र घोडके यांना ग्रामपंचायतला उपाय योजना सांगण्याची वेळ आली.आणि आठ दिवसात पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटला नाही तर पुढील मोर्चा हा हातात दांडके घेऊन असेल असे श्री.धनंजय शिंदे यांनी यावेळी बोलताना सांगितले.
श्री अमोल बोरुडे यांनी ग्रामपंचायत मध्ये ग्रामस्थांना शासकीय कामाच्या निमित्ताने लागणारे दाखले घेताना ग्रामपंचायत कडून नागरिकांची होणारी अडवणूक यावर भाष्य केले. मोर्चा वेळी समस्त महिला वर्गाने आपला रोष व्यक्त करत ग्रामपंचायत जवळ पिण्याचे पाण्याचे माठ फोडून आपलं राग व्यक्त केला.यावेळी महिला वर्ग अन तरुण युवक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
मांडवगण ग्रामपंचायत मधील सत्ताधारी अन विरोधी सदस्यांनी एक गोष्ट लक्षात घ्या जनतेने तुम्हाला गावाच्या विकासासाठी निवडून दिले आहे तर गावाचा विकासच करा एवढे दिवस तुम्हाला वाटत असेल तुम्हाला प्रश्न विचारनारे कोणी नाही पण आता जनता पेटली आहे तुम्हाला प्रश्न विचारल्याशिवाय जनता शांत बसणार नाही उग एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करण्यापेक्षा जनतेने ज्या विकास कामासाठी तुम्हाला निवडून दिले आहे. ते विकासकामे करावे अन्यथा गाठ गावातील जागृत तरुण वर्गाशी आहे हे लक्षात ठेवावे.
“दुसऱ्यांचे पक्ष फोडण्यापेक्षा भाजपने स्वतःचा पक्ष बांधावा”, मनसेने दिला भाजपला सल्ला
मोर्चाचे आयोजन पत्रकार श्री.राजेंद्र घोडके, माजी उपसरपंच धनंजय शिंदे, अमोल बोरुडे, संभाजी ब्रिगेड शेतकरी आघाडीचे प्रदेश उपाध्यक्ष संग्राम देशमुख ,शिवाजी वाघमारे, हेमंत लोखंडे, नौशाद शेख, दत्ता जावळे, लखन लोखंडे ,जयसिंग खेंडके यांनी केले यावेळी छाया घोडके, वनिता चव्हाण, सुमनताई देसाई, माया जवळे, पुष्पा जवळे, राणी जवळे इत्यादींसह महिलांचा सहभाग देखील मोठ्या प्रमाणात होता केले.