Pune News । पुणे : अलीकडच्या काळात फसवणुकीच्या (Fraud) घटनांमध्ये वाढ झाली आहे. यामध्ये सेलिब्रेटी, दिग्ग्ज नेते नाही तर सर्वसामन्यांनाही टार्गेट केले जाते. सध्या बेरोजगारीचे (Unemployment) प्रमाण खूप वाढले आहे. नोकरीच्या नावाखाली अनेकांना लाखो रुपयांचा गंडा बसत आहे. परंतु एक धक्कादायक माहिती समोर आली आहे, ज्यामुळे सर्वांच्याच पायाखालची जमीन सरकली आहे. (Latest Marathi News)
याबाबत सविस्तर माहिती अशी की, पुणे शहरातील मार्कट यार्डमधील आंबेडकरनगरमधील ही घटना (Pune Crime News) आहे. त्यांना सौदी अरेबियामध्ये (Saudi Arabia) नोकरी देण्याचे आमिष देण्यात आले होते. त्यांना 35,000 पगार देण्याचे निश्चित झाले. त्यासाठी त्या मुंबईतील एका एजंटमार्फत सौदी अरेबियामध्येही (Job in Saudi Arabia) दाखल देखील झाल्या. परंतु पुढे त्यांच्यासोबत असे घडले की त्यांनी त्याची कधीच कल्पनाही केली नसेल.
सौदी अरेबियामध्ये त्यांना विविध ठिकाणी घरकामासाठी पाठवण्यात आले. परंतु तिथे त्यांना काम न देता घरमालकांकडून मारहाण करण्यात आली. पगारही न देता उपाशी ठेवले. अखेर त्रासाला कंटाळून त्यांनी राज्य महिला आयोगाचा ईमेल आयडी मिळवून त्यावर मदतीची याचना केली. त्यानंतर परराष्ट्र मंत्रालयाला सौदी अरेबियातील परराष्ट्र मंत्रालयाशी संपर्क साधून तीन महिने प्रयत्न केल्यानंतर त्या महिलांना भारतात आणण्यात यश आले.
Anju Verma । प्रेमापोटी पाकिस्तानात गेलेली अंजू परतणार मायदेशात, महत्त्वाचं कारण आलं समोर