आजकाल सर्वच क्षेत्रात महिला पुरुषांच्या बरोबरीने काम करत आहेत. स्त्री-पुरुष समानता आज समाजात पसरताना दिसत आहेत. इतकंच नाही तर आज देशाच्या सर्वोच्च पदी देखील महिला विराजमान आहेत. अशातच आणखी एक नवीन माहिती समोर येत आहे. महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन मंडळाने महिलांना चालक होण्याची संधी दिली आहे. यामुळे महाराष्ट्रात पहिल्यांदाच महिला चालक एसटी बस चालवताना दिसणार आहे.
राखी सावंतचे लग्न धोक्यात; स्वतःच केला खुलासा, म्हणाली…
या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने (MSRTC ) महिलांना चालक होण्यासाठी प्रशिक्षण देण्याचे ठरवले आहे. यामुळे राज्यात पहिल्यांदाच एसटी बसचे स्टेअरिंग महिलांच्या हाती जाणार आहे. MSRTC मध्ये आजपर्यंत एकही महिला ड्रायव्हर नव्हती. दरम्यान महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाअंतर्गत येणाऱ्या पुणे विभागात एकूण 17 महिलांचे प्रशिक्षण सुरू झाले आहे. यातील सहा महिलांनी पहिल्या टप्प्यातील 3 हजार किलोमीटरचे प्रशिक्षण पूर्ण केले आहे. याशिवाय उर्वरित सहा महिला एसटी चालकांचे दुसऱ्या टप्प्यातील प्रशिक्षण सुरू आहे.
“कोयता गँगला पकडा, बक्षीस मिळवा”, कोयता गँगला पकडण्यासाठी पुणे पोलिसांची फिल्डिंग
महिलांचे हे प्रशिक्षण मार्चच्या शेवटी पूर्ण होणार आहे. यानंतर महिला एसटी चालवतील. 2019 मध्ये पहिल्यांदाच महिला एसटी चालकांसाठी जाहिरात दिली गेली होती. मात्र कोरोनाच्या काळात हे प्रशिक्षण थांबले. आता हे प्रशिक्षण संपत आले आहे. प्रशिक्षणानंतर या महिलांना डेपो दिला जाणार आहे. दरम्यान या महिला देखील एसटी चालवण्यासाठी प्रचंड उत्सुक असून आपण महाराष्ट्राची सेवा करू शकतो ही अभिमानाची भावना असल्याचे त्यांनी सांगितले आहे.
अर्थसंकल्प सादर होताच विवेक अग्निहोत्रींची दिली प्रतिक्रिया; म्हणाले…