आजच्या काळात नोकरीला (Job) विशेष महत्व आहे. ‘चांगल्या पगाराची नोकरी म्हणजे सुखाची भाकरी’ अशी परिस्थिती सगळीकडे आहे. दरम्यान जर गलेलठ्ठ पगाराच्या नोकरीची ऑफर मिळाली तर लोक हसत हसत स्वीकार करतात. परंतु, स्कॉटलंड ( Scotland) मध्ये कोस्टल रिगरच्या जागा खूप काळापासून रिक्त आहेत. या जागेला महिना 4 लाख रुपये पगार आहे. मात्र या भरगच्च पगाराच्या नोकरीकडे लोकांनी पाठ फिरवली असून यासाठी कुणीच उमेदवारी अर्ज केलेला नाही.
आईच्या जिद्दीला सलाम! तान्ह्या बाळाला झोळीत टाकून तिने दिला बारावीचा पेपर
महिना चार लाख रुपये वेतन, हॉलिडे ट्रॅव्हल, वर्क फ्रॉम होम चा पर्याय अशा आकर्षक ऑफर असून देखील कुठलाच उमेदवार या नोकरीसाठी अर्ज करत नाहीय. दरम्यान ऑनशोर रिग ही समुद्रावर किंवा समुद्रात असलेली एक मोठी रचना आहे. ही रचना विहिरी ड्रिल करण्यासाठी, तेल आणि वायू काढण्यासाठी आणि परिष्कृत करण्यासाठी वापरली जाते. यानंतर ते जमिनीवर आणले जाईपर्यंत साठवले जाते. अशा ठिकाणी काम करण्यासाठी कंपनी अशाच लोकांना कामावर ठेवते जे एकाचवेळी 6 महिन्यांच्या पोस्टिंगसाठी तयार असतात.
गौतमी पाटीलच्या कार्यक्रमात पुन्हा एकदा राडा, तरुणांनी पैशाची उधळण करताच पोलिसांनी केला लाठीचार्ज
येथे काम करणाऱ्या व्यक्तीला 12 तासांची शिफ्ट करावी लागते. यासाठी दररोज 36 हजरांचे वेतन मिळते. जर एखादी व्यक्ती इथे फक्त 2 वर्षे राहिली तर तिला कोटींच्या घरात पगार मिळतो. मात्र या जागेसाठी योग्य उमेदवार निवडता यावा यासाठी कंपनीने 4 निकष लावले आहेत.
1 )बेसिक ऑफशोर सेफ्टी इंडक्शन आणि इमर्जन्सी ट्रेनिंग
2) अतिरिक्त ऑफशोर इमर्जन्सी ट्रेनिंग
3) कंप्रेस्ड एअर इमर्जन्सी ब्रेथिंग सिस्टम
4)OGUK आणि इतर वैद्यकीय प्रशिक्षण कार्यक्रम
उद्धव ठाकरेंचा भाजपवर हल्लाबोल! कसबा, चिंचवड पोटणीवडणुकीच्या प्रचारादरम्यान केले गंभीर आरोप
एकूण पाच पदांसाठी कंपनीकडून अर्ज स्वीकारले जात आहेत. 24 दिवसांपूर्वी याबाबतची नोटीस देखील काढण्यात आली होती. मात्र अद्यापही या जागांसाठी कोणीही अर्ज केलेला नाही.
शेळ्या मेंढ्यांच्या मागे फिरणाऱ्या 80 वर्षाच्या आजींनी विठुरायाच्या चरणी अर्पण केले चक्क लाखो रुपये!