Agri Machinary । कामाची बातमी! पिकातील तणांच्या नायनाटासाठी ‘हे’ यंत्र ठरेल फायदेशीर, जाणून घ्या किंमत

Work news! This machine will be beneficial for the eradication of weeds in the crop, know the price

Agri Machinary । कोणत्याही पिकाची लागवड (Cultivation of crops) केली तर आंतरमशागत खूप महत्त्वाची असते. नाहीतर त्यात मोठ्या प्रमाणात तण (Weed) झालेले पाहायला मिळते. अनेकजण तणाच्या नायनाटासाठी कोळपणी करतात. तर काही शेतकरी औषध फवारणी करतात. परंतु तरीही संपूर्णपणे तणाचा नायनाट होत नाही. पुन्हा कोळपणी किंवा औषध फवारणी करावी लागते. महत्त्वाचे यामध्ये खर्च (Cost) मोठ्या प्रमाणावर होतो. (Latest Marathi News)

Eye Flu । सावधान! राज्यात झपाट्याने पसरतेय डोळ्यांची साथ, अशी घ्या काळजी

परंतु आता शेतकऱ्यांचा हा खर्च वाचू शकतो. कारण आता बाजरात एक यंत्र आले आहे, ज्यामुळे तणाचा पूर्णपणे नायनाट होईल. शेतकऱ्यांची हीच समस्या लक्षात घेता नवीन यंत्र विकसित करण्यात आले असून या यंत्राचे नाव सानेडो (Sanedo) असे आहे. ट्रॅक्टर प्रमाणे हे मशीन काम करते. यात हायड्रोलिक सिस्टम सह पाच फॉल कल्टीवेटर दिले आहेत.

Ajit Pawar : आगामी निवडणुकांमध्ये अजित पवार कमळाचे बटन दाबा म्हणत प्रचार करतील; भाजपच्या बड्या नेत्याचे वक्तव्य

या कल्टीवेटरच्या मदतीने तण काढणीचे काम व्यवस्थितपणे करून मोकळी झालेली माती बेडवर व्यवस्थित टाकण्यात येते. किमतीचा विचार केला तर याची किंमत (Sanedo Price) एक लाख 25 हजार रुपये इतकी आहे. ते डिझेल वर चालते. अल्पभूधारक शेतकऱ्यांसाठी हे मशीन खूप फायदेशीर आहे. याची दहा हॉर्स पावर इंजिन क्षमता आहे. हे मशीन प्रति तास फक्त आठशे मिली इतक्या डिझेलचा वापर करते.

Sharad Pawar | शरद पवारांपुढे मोठे संकट! नरेंद्र मोदींच्या सन्मानाला जाणार की विरोधी पक्षांची एकजूट बळकट करणार?

Spread the love