World Cup Final 2023 । ग्लेन मॅक्सवेलने विश्वचषक 2023 च्या फायनलची विजयी रन पूर्ण करताच संपूर्ण ऑस्ट्रेलियन संघ मैदानाकडे धावला. अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवरही फटाक्यांची आतषबाजी सुरू झाली. एकीकडे या जल्लोषाच्या वातावरणाला नुकतीच सुरुवात झाली होती, तर दुसरीकडे काही चेहऱ्यांची छायाचित्रे दिसू लागली जी भारतीय चाहत्यांना अनेक वर्षे सतावत राहतील. ही छायाचित्रे भारतीय खेळाडूंच्या चेहऱ्यांची होती, ज्यामध्ये निराश भारतीय खेळाडूंचे चेहरे पूर्णपणे लटकलेले होते. (World Cup Final 2023)
Hingoli Earthquake । ब्रेकिंग न्यूज! हिंगोली जिल्ह्यामध्ये २० ते २५ गावांमध्ये भूकंपाचे तीव्र धक्के
काही खेळाडू मैदानात बसले, काहींनी आकाशाकडे बघायला सुरुवात केली, काहींनी टोप्या घालून तोंड लपवले. या सगळ्यात दोन फोटोंनी सगळ्यांचे लक्ष वेधून घेतले. ही छायाचित्रे कर्णधार रोहित शर्मा आणि वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराज यांची आहेत.
मॅक्सवेलने धावा पूर्ण करताच रोहित शर्मा पॅव्हेलियनकडे वळला. त्याचा वेग मंदावला आणि तो शांतपणे ड्रेसिंग रूमकडे निघाला. काही काळ तो हळू हळू पुढे सरकला पण नंतर त्याच्या चेहऱ्यावरचे भाव झपाट्याने बदलू लागले. आधी त्याचा चेहरा लाल झाला आणि मग तो रडू लागला. त्याने आपले अश्रू आवरण्याचा प्रयत्न सुरू केला पण तो अश्रू रोखू शकला नाही. मैदानातून बाहेर पडताना रोहित रडतानाचे हे छायाचित्र कॅमेऱ्यात कैद झाले आहे.
Eknath Shinde । मोठी बातमी! ओबीसी मुलींना 100% फी माफी? शिंदे सरकारचा मोठा निर्णय
Dear Ro please don't cry Man 💔🥺#INDvsAUS | #RohitSharma𓃵 pic.twitter.com/vQI1eu4c0L
— Aarz-e-ishq (@Aarzaai_Ishq) November 19, 2023
त्याचबरोबर, वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराज खेळपट्टीवरच रडायला लागला. त्याचे अश्रू थांबण्याची चिन्हे दिसत नव्हती. सहकारी खेळाडूंनी त्याचे सांत्वन केले. दरम्यान, २०२३ च्या विश्वचषक स्पर्धेत भारताने सर्व १० सामने एकतर्फी जिंकून अंतिम फेरीत प्रवेश केला होता. मात्र शेवटच्या टप्प्यात त्यांना एकतर्फी पराभव स्वीकारावा लागला. प्रथम फलंदाजी करताना भारताने 240 धावा केल्या, प्रत्युत्तरात ऑस्ट्रेलियाने 4 गडी गमावून सहज लक्ष्य गाठले.
मोलगीत दातांचा दवाखान्याचे उद्घाटन, विधान परिषदेचे आमदार आमश्या पाडवी यांच्या हस्ते संपन्न
Siraj knows whats coming, Bumrahs telling him to get used to it. pic.twitter.com/oVrZ7mEiZp
— Not Zeeshan (@Z_Ali777) November 19, 2023