
मुंबई : आज १७ सप्टेंबर रोजी आपल्या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा वाढदिवस आहे. परंतु या वर्षी वाढदिवस (Birthday) साजरा करण्यासाठी नरेंद्र मोदी भारतात नाहीत. पण तरी देखील त्यांचे चाहते आणि कार्यकर्ते मोदींचा वाढदिवस धुमधडाक्यात साजरा करण्याच्या तयारीत आहेत. दरम्यान अशातच काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी भाजप (bjp) सडकून टीका केली असून नोटबंदी ( Demonetization) हा देशातील, जगातील सर्वात मोठा भ्रष्टाचार (Scam) असल्याचा आरोप काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केला.
मराठवाडा मुक्ती संग्राम लढा हिंदू विरुद्ध मुस्लिम असा नव्हता; अनिल पहाडे यांचे प्रतिपादन
नोटबंदी राबवून भाजपने काळा पैसा जमा केला. त्यामाध्यमातून जिल्ह्या जिल्ह्यात भाजपची कार्यालये उभारण्यात आल्याचा गंभीर आरोप पटोले यांनी केला. पुढे नाना पटोले म्हणाले की, भाजपने अनेक राज्यात सत्ता स्थापन करण्यासाठी अनेक आमदारांना कोट्यवधी रुपये देऊन त्यांना त्यांच्या पक्षातून फोडले आणि भाजप पक्षात विकत घेतले.
Raju Shetty: पशुपालक शेतकऱ्यांनी येत्या १० दिवसात जनावरांचा विमा उतरावा; राजू शेट्टींची मागणी
याचे ताजे उदाहरण झारखंड आणि पश्चिम बंगालमध्ये आपल्याला दिसून आले आहे. कारण त्याठिकाणी दोन आमदारांना अटक करण्यात आले. पुढे भाजपवर बोचरी टीका करताना पटोले म्हणाले की,भाजप तर चिवडा पार्टी होती मग अचानक इतका पैसा त्यांच्याकडे आला कोठून?असा सवाल नाना पटोले यांनी केला.