मागच्या काही दिवसापासून अवकाळी पावसाने धुमाकूळ घातला आहे. या अवकाळी पावसासह गारपीठ देखील मोठ्या प्रमाणात झाली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. शेतकऱ्यांचे कांदा, गहू, हरभरा, द्राक्षे, केळी अशा अनेक पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. यामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे.
गुढी उभारताना कलश उलटा का ठेवला जातो? ‘हे’ आहे खरे शास्त्रीय कारण
शेतकऱ्यांचे नुकसान झाल्यामुळे राज्य सरकारने लवकरात लवकर पिकांचे पंचनामे करावे अशी मागणी होत आहे. दरम्यान यामध्येच आता पुन्हा एकदा महाराष्ट्रात पाऊस होणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. यामुळे हवामान विभागाच्या अंदाजानुसार 24 मार्चपासून राज्यात काही ठिकाणी अवकाळी पाऊस पडण्याची शक्यता आहे.
पाकिस्तान, अफगाणिस्तामध्ये भूकंपाने 9 ठार तर 100 हून अधिक लोक गंभीर जखमी
हवामान विभागाच्या माहितीनुसार, विदर्भ, उत्तर महाराष्ट्र आणि मराठवाड्यात पुन्हा अवकाळी पाऊस कोसळण्याची शक्यता आहे. यामुळे आता पुन्हा एकदा शेतकऱ्यांसमोर मोठे संकट उभा राहिले आहे. एककीकडे पिकाला भाव मिळत नाही आणि दुसरीकडे अवकाळी पावसामुळे पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. त्यामुळे आता शेतकरी दुहेरी संकटात सापडला आहे. त्यामुळे आपल्या पिकांची काळजी घ्या असं आव्हान कृषी विभागानं शेतकऱ्यांना केलं आहे.