Site icon e लोकहित | Marathi News

Amruta Fadnavis : पुण्याचे पालकमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीसांना पाहायला आवडेल, अमृता फडणवीसांचे वक्तव्य

Would like to see Devendra Fadnavis as guardian minister of Pune, Amrita Fadnavis' statement

मुंबई : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या पत्नी अमृता फडणवीस (Amruta Fadnavis) कायम कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असतात. यावेळी पुण्यातील एका कार्यक्रमामध्ये बोलताना अमृता फडणवीस म्हणाल्या, “देवेंद्र फडणवीस पुण्याचे पालकमंत्री म्हणून देखील पाहायला आवडेल. फडणवीसांची जन्मभूमी, कर्मभूमी आणि बालेकिल्ला नागपूर (Nagpur) आहे. ते नागपूरचे पालकमंत्री जरी असले, तरी आता ते सर्व महाराष्ट्रासाठी काम करतात”.

मला महाराष्ट्र राज्य खूप आवडते, मला महारष्ट्रात राहायचंय त्यामुळे देवेंद्र फडणवीसांना देखील मला महाराष्ट्रातच पहायला आवडेल, असे अमृता फडणवीस म्हणाल्या. फडणवीसांनी नुकतंच केंद्रीय निवडणूक समितीत स्थान मिळाले आहे. केंद्रीय पातळीवरील फडणवीसांना एका महत्त्वाच्या समितीमध्ये त्यांचा समावेश करण्यात आला आहे. त्यामुळे फडणवीस आता केंद्रीय राजकारणाकडे जातील का? याबाबत अनेक चर्चाना उधाण आले आहे.

MPSC : एमपीएससी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी आनंदाची बातमी! राज्यसेवा आयोगाकडून पदभरतीत 340 जागांची वाढ

विरोधकांनी गद्दार ही टिप्पणी केली होती यावेळी अमृता फडणवीसांनी यावर देखील प्रत्युत्तर दिले आहे. टीका करणाऱ्यांची विश्वासाहर्ता काय आहे? अशा व्यक्तींवर बोलणं म्हणजे प्रतिष्ठा सोडून बोलल्यासारखं होईल, असे अमृता फडणवीस म्हणाल्या.

Spread the love
Exit mobile version