
अखेर, जगातील सर्वात मोठ्या मायक्रो-ब्लॉगिंग साइट ट्विटरची ( Twitter) कमान आता जगातील सर्वात श्रीमंत इलॉन मस्क यांच्या हातात आली आहे. इलॉन मस्क (Elon Musk) यांनी पदभार स्वीकारताच सीईओ पराग अग्रवाल (Parag Agarwal) यांच्यासह अनेक उच्चपदस्थ अधिकाऱ्यांची हकालपट्टी केली आहे. रिपोर्टनुसार, ट्विटरचे मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) पराग अग्रवाल आणि मुख्य वित्तीय अधिकारी (सीएफओ) नेड सेगल यांना मस्क मालक बनल्यानंतरच काढून टाकण्यात आले आहे. ट्विटरच्या कायदेशीर टीमच्या प्रमुख विजया गड्डे यांचाही बडतर्फ करण्यात आलेल्या उच्च अधिकाऱ्यांमध्ये समावेश आहे.
‘तुम्ही गरोदर कधी होणार?’, ‘या’ सरकारने नवविवाहीत महिलांना विचारला आगळाववेगळा प्रश्न; वाचा सविस्तर
एलन मस्क आता ट्विटर चे मालक झाले आहेत. दुसरीकडे गेल्या दोन वर्षांपासून कंगना (Kangana Ranaut) ट्विटवर बॅन आहे. तिनं यापूर्वी केलेल्या वादग्रस्त वक्तव्याचा तिला मोठा फटका बसल्याचे दिसून आले आहे. त्यामुळेच की काय तिचं ट्विटर अकाउंट सस्पेंड करण्यात आले होते. आता एलन मस्क आल्यानं आपल्याला तो पुन्हा ट्विटरवर सहभागी करुन घेईल. असे कंगनाला न वाटल्यास नवल. म्हणून की काय तिनं एक स्टोरी शेयर केली आहे.
“वयोमानुसार त्यांनी वक्तव्य केली पाहिजे…” , रावसाहेब दानवेंनी आदित्य ठाकरेंवर साधला निशाणा
इलॉन मस्कच्या या करारानंतर, कायमस्वरूपी बंदी घालण्यात आलेल्या सर्व ट्विटर अकाउंटवरूनही ही बंदी हटवण्यात येणार असल्याचे वृत्त आहे. या यादीत बॉलिवूड अभिनेत्री कंगना रणौत आणि अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचाही समावेश आहे. ट्विटरने या लोकांच्या खात्यांवर कायमची बंदी घातली आहे. कंगनाच्या अकाऊंटवर मे २०२१ मध्ये बंगाल हिंसाचाराच्या विरोधात केलेल्या ट्विटवर बंदी घालण्यात आली होती.