Site icon e लोकहित | Marathi News

निसर्गाचा प्रकोप! भुस्खलन, मंदिर कोसळून 21 भाविकांचा मृत्यू

Wrath of nature! Bhuskhalan, the temple collapsed; 21 devotees died

राज्यात जरी पावसाने दडी मारली असली तरी हिमाचल प्रदेश (Himachal Pradesh) आणि उत्तराखंडमध्ये (Uttarakhand) मुसळधार पावसाने थैमान घातले आहे. मंडीतील नागचला येथे ढगफुटी झाल्याने संपूर्ण जनजीवन विस्कळीत झाले आहे. शिमल्यामध्ये अतिवृष्टीमुळे (Heavy rain in Shimla) भुस्खलन आणि दरड कोसळली आहे. येथे भुस्खलन झाल्यामुळे शिव मंदिर कोसळले आहे. यात 21 जणांचा मृत्यू झाला असून ढिगाऱ्याखाली 50 भाविक अडकल्याची माहिती समोर आली आहे. (Latest Marathi News)

Varas Nond Online । आनंदाची बातमी! आता फोनवरच करता येणार वारस नोंदणी, कसं ते जाणून घ्या

दरम्यान, अशीच काहीशी परिस्थिती उत्तराखंडमध्ये (Heavy rain in Uttarakhand) पाहायला मिळत आहे. उत्तराखंडमधील मालदेवता येथील देहरादून डिफेन्स कॉलेजची इमारत ढासळली आहे. मुसळधार पावसामुळे हवामान खात्याने सहा जिल्ह्यांमध्ये रेड अलर्ट जारी केला आहे. तर शिमला, चंबा, कुल्लू, कांगड़ा, मंडी, लाहौल आणि स्पीति किन्नौर जिल्ह्यांमध्ये ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. शिवाय काम असेल तरच बाहेर पडण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

Sharad Pawar । सर्वात मोठी बातमी! राष्ट्रवादीच्या फुटीबाबत शरद पवार यांनी केला मोठा गौप्यस्फोट

प्रशासनाने याच पार्श्वभूमीवर हिमाचल प्रदेशमधील सर्व शाळा, महाविद्यालये आणि शिक्षण संस्थांना सुट्टी दिली आहे. तसेच राज्यातील एकूण ३०२ रस्ते वाहतुकीसाठी बंद ठेवले असून भूस्खलनानंतर २०० बसेस विविध ठिकाणी अडकून पडल्या आहेत. ११८४ ट्रान्सफॉर्मर्स बिघडले आहेत. जोरदार पावसामुळे अनेक भागांमधील वीज गेली आहे.

Share Market । गुंतवणूकदारांनो, करायची असेल चांगली कमाई तर ठेवा ‘या’ शेअर्सवर लक्ष

त्याशिवाय सोलन जिल्ह्यातील कंडाघाटमधील जडोंनमध्ये ढगफुटी झाली असून यात सात जणांचा मृत्यू झाला आहे. तर मंडी येथील नागचला येथे ढगफुटी झाल्यामुळे नाल्यातील पाणी हायवेवर आले आहे. त्यामुळे मंडी आणि कुल्लुचा संपर्क तुटला आहे.

Johny Lever Birthday । जॉनी लिव्हर दिवसाला कमावत होते ५ रुपये, जीवही देण्याचा प्रयत्न केला पण..

Spread the love
Exit mobile version