Site icon e लोकहित | Marathi News

Wtc Final 2023 | टीम इंडियाला मोठा दिलासा; केएल राहुलच्या जागी ‘या’ दिग्गज खेळाडूची निवड

Wtc Final 2023 | Big relief for Team India; Selection of 'Ya' legend to replace KL Rahul

आयपीएल झाल्यानंतर भारतीय क्रिकेट संघ ( Indian Cricket Team) एका नव्या मोहिमेवर असणार आहे. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फायनल ( World Test Championship) तोंडावर आली आहे. टीम इंडियाचा हा सामना ऑस्ट्रेलियासोबत होणार असून या पार्श्वभूमीवर भारतीय क्रिकेट संघ लवकरच तयारीला लागणार आहे. या सामन्याला फक्त एक महिना राहिला उरला आहे.

AC खरेदी करायचाय तर मग विचार कशाचा करताय? Amazon वर खास ऑफर, फक्त अर्ध्या किंमतीत मिळतोय एसी; जाणून घ्या…

मात्र, अशातच भारतीय क्रिकेट संघातील अनेक खेळाडू दुखापतीच्या कचाट्यात सापडले आहेत. यामध्ये शार्दूल ठाकूर, जयदेव उनाडकट आणि ऋषभ पंत यांचा समावेश आहे. त्यातल्या त्यात टेन्शन देणारी बाब म्हणजे आयपीएलमध्ये नुकत्याच झालेल्या सामन्यात के एल राहुलच्या (K. L. Rahul) मांडीला फिल्डिंग दरम्यान दुखापत झाली.

Uorfi Javed । उर्फी जावेदसोबत सेल्फी काढण्यासाठी मोजावे लागणार पैसे, एका फोटोसाठी किती पैसे?

या कारणामुळे के एल राहुलला आयपीएल ( IPL) आणि अगामी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फायनल मधून बाहेर पडावे लागले. यामुळे भारतीय क्रिकेट संघात अत्यंत तणावाचे वातावरण होते. दरम्यान आयपीएल मध्येच टीम इंडियाला के एल राहुलची रिप्लेसमेंट मिळाली आहे.

Ajit Pawar | अजित पवार म्हणाले, “तो विषय संपला! महाविकास आघाडीला… “

गुजरात टायटन्स संघातील अनुभवी विकेटकीपर बॅट्समन ऋद्धीमान साहा ( Hriddhiman Saha) याची आयपीएल मधील कामगिरी जबरदस्त आहे. यामुळे निवड समितीला के एल राहुलच्या जागी नवीन बदली खेळाडूचा पर्याय मिळाला आहे. केएल राहुलच्या जागी ऋद्धीमानला वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप फायनलमध्ये संधी मिळायला हवी, असं नेटकऱ्याचे सुद्धा म्हणणे आहे.

Rakhi Sawant | अखेर राखी सावंतला मिळाला तिचा शहजादा! दुबई मध्ये गेली आणि…

Spread the love
Exit mobile version