झुंड चित्रपटातील ‘या’ अभिनेत्याला चोरीच्या आरोपाखाली अटक; वाचून तुम्हालाही बसेल धक्का

'Ya' actor of Jhund film arrested on theft charges; You will also be shocked to read it

नागराज मंजुळे यांचे आतापर्यंतचे सगळेच चित्रपट चौकटी मोडणारे ठरले आहेत. सैराट, नाळ, फँड्री यांसारख्या चित्रपटांच्या यशानंतर त्यांचा ‘झुंड’ (Zund) हा चित्रपट चांगलाच गाजला. या चित्रपटाचे खूप मोठ्या प्रमाणात कौतुक झाले. चित्रपटातील अमिताभ बच्चन यांच्यासारख्या बड्या अभिनेत्याची भूमिका, उत्तम पटकथा व भावणारी दृश्ये यामुळे या चित्रपटाला लोकांनी अक्षरशः डोक्यावर घेतले. तुम्हाला वाचून धक्का बसेल पण, या चित्रपटातील एका अभिनेत्याला नुकतीच चोरीच्या गुन्ह्याखाली अटक करण्यात आली आहे.

शेण गोमूत्राची अंघोळ आणि शेण गोमुत्राचे लेपन; वाचा याबद्दल संपूर्ण माहिती

‘झुंड’ चित्रपटातील बाबू फेम ‘प्रियांशू क्षत्रिय’ (Priyanshoo Kshatriy) या अभिनेत्याला अटक करण्यात आली आहे. 18 वर्षीय प्रियांशूवर चोरीचा आरोप आहे. नागपूर येथील एका ठिकाणी झालेल्या चोरीत पाच लाख रुपयांचे दागिने व रोकड लंपास करण्यात आली. या संदर्भात एका संशयित म्हणून एका अल्पवयीन मुलाला अटक करण्यात आली असता, या चोरीत प्रियांशू क्षत्रिय याचा सहभाग असल्याचे उघड झाले.

एक थेंब दुधाच्या थेंबालाही किंमत मिळणार; वाचा, शासनाचा नवीन निर्णय

सध्या प्रियांशूला पोलीस कोठडी सुनावली असून गड्डी गोडाऊन परिसरातून चोरीचा माल देखील जप्त करण्यात आला आहे. याआधी सुदधा प्रियांशूला ट्रेन मधील लोकांचे मोबाईल चोरण्याप्रकरणी अटक करण्यात आली होती. 2021 मध्ये नागपूर पोलिसांनी मोबाईल चोरी करणाऱ्या टोळीला अटक केली होती. यामध्ये प्रियांशू क्षत्रिय याचा सहभाग होता.

“…तर लवकरच महाराष्ट्राचा बिहार होईल”, ‘या’ लावणीसम्राज्ञीने गौतमी पाटीलवर केली जोरदार टीका

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *