आजकाल सगळेच लोक सोशल मीडियावर सक्रिय असतात. त्यातल्या त्यात पडद्यावर काम करणारे अभिनेते व अभिनेत्र्या तर सोशल मीडियावर कायम चर्चेत असतात. अभिनेत्री कनिष्का सोनी (Kanishka Soni) देखील सध्या तिच्या एका पोस्टमुळे चर्चेत आली आहे.
मोठी बातमी! शेतातील पाचट जाळणाऱ्या शेतकऱ्यांना मिळणार नाही पीएम किसान योजनेचा लाभ; वाचा सविस्तर
‘दिया और बाती हम’ (Diya Aur Bati Hum) या छोट्या पडद्यावरील मालिकेतील अभिनेत्री कनिष्का सोनीने इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली होती. या पोस्ट मध्ये कनिष्कने तिच्या प्रग्नेंसीबाबत सांगितले आहे. इतकेच नाही तर पोस्टसोबत तिने तिच्या वाढलेल्या पोटाचे फोटो शेअर केले आहेत.
महाराष्ट्र राज्य सहकारी दूधसंघ डबघाईला; कामगारांना पगार देण्याइतकी सुद्धा ऐपत राहिली नाही
“मी स्वतःशीच लग्न केलं म्हणून मी स्वतःच गरोदर आहे असं नाही. हे फक्त पिझ्झा व बर्गरचा परिणाम आहे. हे सर्व पदार्थ खाऊन माझं वजन वाढलं आहे. पण हे सर्व मला आवडणारे पदार्थ आहेत” अशी पोस्ट करत कानिष्काने तिच्या वाढलेल्या पोटाची खिल्ली उडवली आहे. (Kanishka soni’s Instagram Post)
याआधी देखील ती एका पोस्ट मुळे चर्चेत आली होती. इतकेच नाही तर यासाठी तिला सोशल मीडियावर ट्रोल सुद्धा केले होते. कनिष्का सोनीने काहीदिवसांपूर्वी तिच्या लग्नाची पोस्ट केली होती. यामध्ये तिने स्वतःशीच लग्न केल्याची बातमी दिली होती. लग्न करण्यासाठी मला पुरुषाची गरज नाही असं देखील कनिष्काने यामध्ये म्हटलं होतं.
मोठी बातमी! वर्ल्डकप दरम्यान ‘या’ दिग्गज खेळाडूने अचानक घेतली निवृत्ती