महागाई प्रचंड वाढली असून सर्वसामान्यांना महागाईतून काही दिलासा नाहीच. मागच्या काही दिवसांपूर्वी तेल, डाळी याचे दर गगनाला भिडले आहेत. दरम्यान आता दूध दरामध्ये पुन्हा वाढ झाली आहे. त्यामुळे सर्वसामान्यांना महागाईपासून दिलासा नाहीच. मदर डेअरीने दुधाच्या (Milk) दरात वाढ केली असून फुल क्रीम दूध ६४ रुपये प्रति लिटर मिळणार आहे जे आधी ६३ रुपये प्रतिलिटर मिळायचे. त्यामुळे एक रुपयाची वाढ झाली आहे.
एकतर्फी प्रेमातून तरुणाने उचलले मोठे पाऊल; स्वतःला पेटवून घेत तरुणीला मारली मिठी
त्याचबरोबर मदर डेअरीने टोकन (Token by Mother Dairy) दुधामध्ये वाढ केली असून, प्रतिलिटर ४८ वरून आता प्रतिलिटर ५० रुपये दर झाले आहेत. म्हणजेच आता रोजचा चहा (tea) देखील महागणार आहे. त्यामुळे सर्वसामान्य लोकांच्या खिशाला कात्री लागणार आहे.
विमा कंपन्यांकडून शेतकऱ्यांची फसवणूक; शेतकरी आक्रमक
दरम्यान अलीकडेच मागच्या काही दिवसांपूर्वी मदर डेअरी आणि अमूलने दुधाच्या दरात वाढ केली होती. अमूल आणि मदर डेअरीने (Amul and Mother Dairy) दुधाच्या दरात लिटरमागे जवळपास २-२ रुपयांनी वाढ केली होती.