आपल्या राजकीय भूमिकांमुळे चर्चेत असणाऱ्या दिपाली सय्यद ( Dipali Sayyad) यांच्यावर त्यांच्याच पीएने गंभीर आरोप केले आहेत. यामध्ये दिपाली सय्यद यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे ( Raj Thackeray) यांना जीवे मारण्याचा कट रचला होता तसेच आर्थिक गैरव्यवहार देखील केले असल्याचे आरोप करण्यात आले आहेत. याआधी देखील दिपाली यांच्या माजी पीएने त्यांच्यावर गंभीर आरोप केले होते.
शेतकऱ्याने लिहिले मुख्यमंत्र्यांना रक्ताने पत्र
दिपाली सय्यद यांचे माजी पीए भाऊसाहेब शिंदे ( Bhausaheb Shinde) यांनी अहमदनगर येथे पत्रकार परिषद घेत धक्कादायक माहिती दिली आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना जीवे मारण्यासाठी दिपाली सय्यद यांनी खासदार बृजभूषण सिंग यांची भेट घेतली होती. आयोध्या दौऱ्यावेळी दिपाली सय्यद यांनी सिंग यांना राज ठाकरे यांच्या विरोधात उकसवण्याचे काम केले आहे.
मोठी बातमी! भीमा पाटसचे फक्त 8 दिवसात 19 हजार मेट्रिक टन ऊसाचे गाळप
इतकंच नाही तर दिपाली सय्यद यांचे कुख्यात गुंड दाऊद इब्राहिम ( Daud Ibrahim) सोबत संबंध आहेत. दिपाली भोसले सय्यद चॅरिटेबल ट्रस्टच्या माध्यमातून होणारे सर्व व्यवहार हे बेकायदेशीर आहेत. यासाठी दाऊद इब्राहिम व त्याच्या सहकाऱ्यांकडून पैसा पुरवला जातो.
जनावरांचे दूध वाढवण्यासाठी करा ‘हे’ नैसर्गिक उपाय!
तसेच दिपाली सय्यद यांच्या ट्रस्टमधून सातशे ते आठशे कोटींचा व्यवहार झाला यासाठी पैसे कोठून आले ? असा प्रश्न देखील भाऊ शिंदे यांनी यावेळी उपस्थित केला आहे. माझ्याकडे या सगळ्याचे पुरावे असून मला संरक्षण दिल्यास मी ते पुरावे सादर करायला तयार आहे. असे भाऊ शिंदे यावेळी म्हणाले आहेत.
ब्रेकिंग! नरेंद्र मोदींच्या सर्वात जवळची व्यक्ती रुग्णालयात दाखल