Yash Birthday । KGF स्टार यशचे वडील अजूनही बस ड्रायव्हर, संघर्षाची कहाणी वाचून व्हाल थक्क

Yash Birthday

Yash Birthday । सुपरस्टार यशने अल्पावधीतच प्रचंड लोकप्रियता मिळवली आहे. तो सोशल मीडियावर कायम कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असतो. सोशल मीडियावर त्याचा चाहतावर्ग देखील खूप मोठा आहे. प्रशांत नील दिग्दर्शित ‘केजीएफ चॅप्टर 1’ या चित्रपटाद्वारे त्याने संपूर्ण भारतामध्ये स्वत:ची एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. या चित्रपटाने प्रेक्षकांमध्ये खळबळ उडवून दिली आणि 43.9 कोटी रुपयांची (हिंदी) कमाई करत बॉक्स ऑफिसवर हिट ठरला.

Sharad Mohal । शरद मोहळची हत्या का झाली? भाजप आमदाराचा धक्कादायक दावा

‘द रॉकिंग’ स्टार यश ‘KGF’ रिलीज झाल्यानंतर जागतिक स्टार बनला असून आज त्याचा वाढदिवस आहे. त्याच्या ‘KGF Chapter 1’ या चित्रपटाने भारतीय चित्रपटसृष्टीत विक्रम केला. अशा परिस्थितीत यशला केवळ साउथ इंडस्ट्रीच नव्हे तर संपूर्ण देशात प्रेम मिळते आणि लोक त्याची एक झलक पाहण्यासाठी काहीही करू शकतात. साऊथचा सुपरस्टार यश आज त्याचा 38 वा वाढदिवस साजरा करत आहे.

Sharad Mohol । आत्ताच्या घडीची सर्वात मोठी बातमी! शरद मोहोळच्या पत्नीने घेतली देवेंद्र फडणवीसांची भेट

सुपरस्टार यशचे वडील बस ड्रायव्हर आहेत

‘KGF’ अभिनेता मध्यमवर्गीय कुटुंबातील आहे, परंतु आणखी आश्चर्याची गोष्ट म्हणजे त्याचे वडील अजूनही बस ड्रायव्हर आहेत. यशचे वडील कर्नाटकात KSRTC परिवहन सेवेत काम करतात. अभिनेता यशने त्याच्या आयुष्यात खूप संघर्ष केला आणि आपली स्वप्ने पूर्ण करण्यासाठी बेंगळुरूला गेला आणि आता तो सुपरस्टार बनला आहे. त्याच्या वडिलांनी अजूनही हा व्यवसाय सोडलेला नाही. यशने इंडिया टुडे कॉन्क्लेव्ह 2022 मध्ये त्याच्या पालकांबद्दल सांगितले. मग त्याने सांगितले की त्याचे वडील अजूनही बस ड्रायव्हर म्हणून काम करतात.

Ajit Pawar । मोठी बातमी! मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण मिळणार नाही, अजित पवारांचा मोठा गौप्यस्फोट

अभिनेत्याने सांगितले की, ‘माझे आई-वडील माझा कोणताही चित्रपट कार्यक्रम पाहण्यासाठी येत नाहीत, ते माझ्या कोणत्याही चित्रपटाच्या शूटिंगलाही येत नाहीत. या कामामुळेच ते मला एवढ मोठ बनवू शकले आहेत, त्यामुळे हे काम कधीच ते सोडणार नाहीत, असा अभिनेत्याचा विश्वास आहे.

Bjp । भाजपला सर्वात मोठा धक्का! बड्या नेत्याने केला ठाकरेंच्या शिवसेनेत प्रवेश

Spread the love