
Yavatmal News । यवतमाळ येथून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी (Prime Minister Narendra Modi) यांच्या कार्यक्रमासाठी उभारण्यात आलेला सभामंडप कोसळल्याची दुर्घटना घडली आहे. यामुळे मोठी खळबळ उडाली आहे. या दुर्घटनेत चार कामगार जखमी झाले असल्याची माहिती मिळत आहे.
Maratha Reservation । धक्कादायक बातमी! जालना जिल्ह्यात शेकडो मराठा आंदोलकांवर गुन्हे दाखल
28 फेब्रुवारीला पंतप्रधान नरेंद्र मोदी यवतमाळ दौऱ्यावर आहेत. त्या ठिकाणी त्यांची जाहीर सभा होणार आहे. या सभेसाठी भारी या गावांमध्ये 45 एकर जागेवर मंडप उभारण्यात येत आहे. मात्र मंडप उभारताना एक डोम उभा करण्याचे काम सुरू असतानाच पिल्लर जमिनीतून निखळला. त्यामुळे त्याचे खांब खाली क्रेनवर कोसळले. यावेळी त्या ठिकाणी कामगार देखील होते. मात्र सुदैवाने यामधून कामगार बचावले असून चार जण जखमी झाले आहेत.
Supriya Sule । “देवेंद्र फडणवीस आणि राज ठाकरे यांना…” सुप्रिया सुळे यांचे सर्वात मोठे वक्तव्य
माहितीनुसार, 28 फेब्रुवारीला नरेंद्र मोदी यवतमाळ नागपूर महामार्गावरील भारी या ठिकाणी आयोजित महिला बचत गटाच्या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत. यावेळी नरेंद्र मोदी दोन लाखांहून अधिक बचत गटांच्या महिलांना संबोधित करणार आहेत. मात्र नरेंद्र मोदींची सभा होण्याआधी त्या ठिकाणी दुर्घटना घडली. त्या ठिकाणी चार कामगार जखमी झाले आहेत. जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत.