यवतमाळ: यवतमाळ (Yavatmal) जिल्ह्यातील शेतकरी पुत्र असलेल्या हर्षल नक्षणे (Harshal Nakshne) एक स्वयंचलित हायड्रोजनिक कार बनवली आहे. विशेष म्हणजे भन्नाट कल्पनेतून बनवलेली ही कार फक्त 150 रुपयात 250 किलो मीटरचा प्रवास करते. या कारची यवतमाळ जिल्ह्यात चर्चा सुरु आहे. महत्वाची बाब म्हणजे हर्षल इतका मेहनती आहे की, त्याने इंटरनेट सेवा पुरविण्याच्या व्यवसायातून मिळविलेल्या पैशातून ही कार बनविल्याची माहिती हर्षल नक्षणे यांनी दिली.
धक्कादायक! इलेक्ट्रिक स्कुटरच्या बॅटरीचा स्फोट होऊन ७ वर्षीय चिमुकल्याचा मृत्यू
सध्याच्या परिस्थितीत वाहन वापरणा-यांची संख्या वाढली असून, पेट्रोल व डिजेलचे (petrol diesel price) दर 120 रुपयावर जाऊन पोहचले आहेत. त्यामुळे हर्षल नक्षणे आपल्या कुणाल आसुटकर नावाच्या मित्राच्या मदतीने ही प्रदुषण मुक्त स्वयंचित ‘सोनिक कार'(Sonic Car) तयार केली आहे. 100 कार तयार झाल्यानंतर ही कार विक्रीसाठी उपलब्ध राहणार आहे. त्यामुळे पेट्रोल व डिजेलवर चालणा-या वाहना पासून सुटका होणार आहे. हर्षल नक्षणे एम.टेक पर्यंत शिक्षण घेतले आहे. त्याचे स्वप्न होते की, भारताकडे धावण्यासाठी स्वत:ची कार सक्षम असली पाहिजे.
विशेष म्हणजे त्या कारमध्ये परवडणाऱ्या किमतीत ग्रीन हायड्रोजन ऊर्जा वापरणे आणि अपघात आणि मानवी चुका कमी होईल अशी ती कार हवी. दरम्यान हर्षलने कुणाल आसुटकर या बालपणीच्या मित्राच्या मदतीने कार बनविण्याचे काम सुरु केले. गेल्या काही दिवसापूर्वीच ही कार तयार झाली आहे. या कारचे वैशिष्टय म्हणजे हायट्रोजन गॅसवर ही कार चालते. तसेच सेल्फ ड्रायव्हींगसाठी या कारमध्ये संगणक तयार केले आहे. हर्षलने प्रायोगिक तत्वावर ही कार बनवली असून, या कारसाठी तब्बल 25 लाख रुपये खर्च आला आहे. तसेच या कारसाठी लागणारे काच व टायर ह्या वस्तू अहमदाबाद येथून खरेदी करण्यात आले.
Raj Thackeray: “…म्हणूनच गांधीजींसारखा”, गांधी जयंती निमित्त राज ठाकरेंनी शेअर केली फेसबुक पोस्ट