Site icon e लोकहित | Marathi News

Abdul Sattar: “ये मीठा है और वो कडू है..” , मेळघाट दौऱ्यावर अब्दुल सत्तारांची विरोधकांवर फटकेबाजी

"Yeh meetha hai aur wo kadu hai..", Abdul Sattar's lashing at opponents on Melghat tour

मुंबई : “माझा एक दिवस बळीराजासाठी “या कृषी विभागाच्या उपक्रमाला अमरावती जिल्ह्यातील मेळघाटमधून सुरुवात झाली.याच पार्श्भूमीवर कृषी मंत्री अब्दुल सत्तार पहाटे पाच पासून मेळघाट दौऱ्यावर आहेत. खास करून दुर्गम भागातील शेतकऱ्यांच्या समस्या जाणून घेण्यासाठी अब्दुल सत्तार या दौऱ्यावर आले आहेत. दरम्यान या दौऱ्यात सत्तारांनी एक वक्तव्य केलय ते खूप गाजतंय.

Pune: श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीसमोर 31 हजार महिलांचे अथर्वशीर्ष पठण

ते म्हणजे … ये मीठा है और वो कडू है..आता प्रश्न पडला असेल की हा टोला कोणाला मारला.तर सत्तार यांनी हसत हसतच बच्चू कडूंवर (Bacchu Kadu) निशाणा साधला. आता अब्दुल सत्तारांच्या या टिप्पणीवर बच्चू कडू काय म्हणतात, हे पहावं लागेल.एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांना पाठींबा देण्यासाठी गुवाहटीत गेल्यानंतरही बच्चू कडू यांना मंत्रीपद न मिळाल्याने ते नाराज असल्याची चर्चा आहे.

दुसऱ्याचं दिवशी का करतात बाप्पाचे विसर्जन? दीड दिवसाचा गणपती म्हणजे नेमकं काय? जाणुन घ्या!

दुश्मन की दुवा करने वाला मुख्यमंत्री

तसेच अब्दुल सत्तार यांनी जळगावात मुक्ताई नगर येथील दौऱ्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जयंत पाटील यांच्यावरही निशाणा साधला. जयंत पाटील यांनी सध्याचं सरकार कोणत्याही स्थितीत कोसळणार, मंत्री अपात्र होतील, असं वक्तव्य केलं होत.याच वक्तव्याला प्रतिउत्तर देताना सत्तार म्हणाले, दुश्मन की दुवा करने वाला मुख्यमंत्री इस राज्य मे है… आमचं सरकार गतिमान आहे. पण याआधीचं सरकार गतीनं गेलं, अशी टीका करत त्यांनी मुख्यमंत्र्यांचं देखील कौतुक केलं आहे.

Shivsena: हे गणराया देशाला ‘निर्भय’ कर, बाप्पाकडे प्रार्थना करत शिवसेनेने भाजपला टोला लगावला

अब्दुल सत्तार यांनी अमोल मिटकरी यांना उद्देशून जोरदार टीका केली आहे. याआधी अमोल मिटकरी यांनी रात्रीच्या वेळी कृषीमंत्री शेतकऱ्याच्या बांधावर जाऊन दौरा करतात, अशी उपरोधिक टीका अमोल मिटकरी यांनी केली होती. याच टिकेला प्रतिउत्तर देताना सत्तार म्हणाले की, देश स्वतंत्र झाल्यापासून कोणताही मुख्यमंत्री एवढा फिरला नसेल. मी फिरतोय तर मिटकरी यांच्या पोटात दुखायला लागलं..

Spread the love
Exit mobile version