
सध्या उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. (Death threat to Uttar Pradesh Chief Minister Yogi Adityanath) यामुळे सगळीकडे खळबळ उडाली आहे. मागच्या काही दिवसापूर्वी नरेंद्र मोदी यांना जीवे मारण्याची धमकी (Death threat to Narendra Modi) देण्यात आली होती आणि आता उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. यासंबंधी ANI या वृत्तसंस्थेने वृत्त दिले आहे.
Hera Pheri 3 : ‘हेरा फेरी 3’ चित्रपटाविरोधात कायदेशीर नोटीस जारी; पाहा नेमकं काय आहे प्रकरण?
आता या प्रकरणी अज्ञात इसमाविरोधात लखनऊच्या पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. उत्तर प्रदेशमध्ये आपात्कालीन विभागाने ११२ हा नंबर मदतीसाठी जारी केला आहे. याच नंबरवर फोन करून अज्ञात व्यक्तीने योगी आदित्यनाथ यांना जीवे मारण्याची धमकी दिली आहे.
धमकी देणारा अज्ञात व्यक्ती नेमका कोण आहे याबाबत अजून माहिती मिळालेली नाही. या प्रकरणात लखनऊच्या सुशांत गोल्फ सिटी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असल्याची माहिती समोर आली आहे. धमकी देणारा अज्ञात कोण आहे? याचा शोध पोलीस यंत्रणा करत आहे.