मुंबई : एकनाथ शिंदेंसह शिवसेनेच्या चाळीस आमदारांनी बंड केले आणि शिवसेना पक्षात उभी फूट पडली.ही फूट
पडल्यापासून शिवसेनेवर अनेक नेत्यांनी टीका केल्याचे पाहायला मिळालं.दरम्यान शिवसेनेचे माजी नेते आणि शिंदे गटाचे समर्थक रामदास कदम सातत्याने शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याविरोधात टीकास्त्र सोडत असतात.दरम्यान आता त्यांनी दसरा मेळाव्यावरून उद्धव ठाकरेंविरुद्ध आक्रमक भूमिका घेतली आहे.
“सीएमआयई” अहवालात दिसून येते भयावह परिस्थिती; बेरोजगारीचा प्रश्न दिवसागणिक उग्र रूप धारण करतोय
रामदास कदम म्हणाले की , “ उद्धव ठाकरे यांनी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसशी युती करून आघाडी आघाडी सरकार स्थापन केले आणि मुख्यमंत्री झाले. दरम्यान त्यादिवसपासून बाळासाहेबांचा विषय त्यांच्यासाठी संपला.मग आता ते बाळासाहेब ठाकरेंचं नाव कसं काय घेऊ शकतात? कारण बाळासाहेबांनी आपलं संपूर्ण आयुष्य राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसबरोबर संघर्ष करण्यात घालवलं.
आता हे उद्धव ठाकरे राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवारांच्या मांडीवर जाऊन बसले आहेत.त्यामुळे आमची शिवसेना हीच बाळासाहेबांची शिवसेना आहे, असं उद्धव ठाकरेंना म्हणता येणार नाही. शिवाजी पार्कवर जाऊन बाळासाहेब ठाकरेंचं नाव घेण्याचा अधिकारही तुम्हाला नाही, अस रामदास कदम म्हणाले.पुढे ते म्हणाले की,एकनाथ शिंदे यांनी बंड पुकारले नसते तर पुढच्या विधानसभेच्या निवडणुकीत शिवसेनेचे पाच आमदारही निवडून आले नसते, शिवसेना सगळी संपली असती, अशी टीका रामदास कदम यांनी उद्धव ठाकरेंवर केली.
ग्रामपंचायत आणि सरपंच पदाविषयी जाणून घ्या सविस्तर माहिती !
पुढे रामदास कदम यांनी विरोधी पक्षनेते अजित पवारांवर देखील टीका केली आहे. “एकनाथ शिंदे यांनी बंडखोरी केल्याने मी त्यांचा खरोखर आभारी आहे. कारण त्यांनीच खऱ्या अर्थाने बाळासाहेब ठाकरेंची शिवसेना जिवंत ठेवली, नाहीतर अजित पवारांनी पुढील ८ -१० वर्षात सर्वच शिवसेना खाऊन टाकली असती.”