एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी शिवसेनेसोबत बंडखोरी केली आणि भाजपसोबत युती करून राज्यात नवीन सरकार स्थापन केले. नंतर ठाकरे गट आणि शिंदे गट असे दोन गट पडले. यांनतर ठाकरे गटाला चांगलीच गळती लागली. अनेक नेत्यांनी पदाधिकाऱ्यांनी शिंदे गटामध्ये प्रवेश केला. दरम्यान, ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांची आज मालेगावमध्ये जाहीर सभा होत आहे. यावेळी शिंदे-फडणवीस सरकारवर उद्धव ठाकरे यांनी जोरदार हल्लाबोल केला आहे.
TMKOC आता मोठ्या पडद्यावर, निर्मात्यांनी केली मोठी घोषणा!
यावेळी बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले की, मालेगावमध्ये कोरोनाने हाहाकार घातला होता . यावेळी नेमकं काय करायचं, असा प्रश्न होता. मालेगावकरांनी जे सहकार्य केलं, त्यासाठी सर्वांचे खूप आभार. असे उद्धव ठाकरे म्हणाले आहे. त्याचबरोबर ते म्हणाले तुम्ही नाव चोरलं, चिन्ह चोरलं, पक्ष चोरला, पण जीवाभावाची माणसं चोरू शकणार नाहीत. असं म्हणत उद्धव ठाकरेंनी सत्ताधाऱ्यांवर जोरदार टीका केली आहे.
बिग ब्रेकिंग! ‘या’ अभिनेत्रीने गळफास घेत २५ व्या वर्षीच संपवले आयुष्य
त्याचबरोबर यावेळी कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या मुद्द्यावरून देखील उद्धव ठाकरे यांनी सरकारला चांगलेच धारेवर धरले. उद्धव ठाकरे म्हणाले, “शेतकरी पुत्र असून शेतकऱ्यांकडे दुर्लक्ष केलं. हे काय शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवणार आहे. असे म्हणत त्यांनी सरकारवर जोरदार टीका केली आहे.
आनंदाच्या शिध्यावरुन अजित पवारांची सरकारवर जोरदार टिका; म्हणाले…