Delhi । मोठ्या प्रमाणात सोशल मीडियाचा (Social media) वापर सध्या केला जात आहेत. मागील काही दिवसांपासून तुम्ही दिल्ली मेट्रोमधील (Delhi Metro) अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर पाहिले असतील. यामध्ये कोणी गाणी म्हणत असतात, कोणी गिटार वाजवत असतात. तर काहीजण थेट अंघोळ करत असतात. तसेच काही संतापजनक कृत्यदेखील मेट्रोत घडत असते. प्रशासनाकडून प्रवाशांना सतत सूचना देऊनही काही प्रवासी ऐकत नाही. त्यामुळे दिल्ली मेट्रो सतत प्रसिद्धीच्या झोतात येत असते.(Latest Marathi News)
Maharashtra Mansoon । शेतकऱ्यांनो तयारीला लागा! राज्यात ‘या’ दिवशी होणार पावसाची एन्ट्री
सध्या असाच एक व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच धुमाकूळ घालत आहे. यामध्ये एक तरुणी घरी वेळ मिळाला नसल्याने हेअर स्ट्रेटनर घेऊन आली आहे. मेट्रोमध्ये उपलब्ध असणाऱ्या इलेक्ट्रीक प्लगला तिने हेअर स्ट्रेटनर लावला असून ती उभी राहून स्ट्रेटनींग करत आहेत. तिची ही कृती पाहून मेट्रोमधील इतर प्रवासी तिला पाहतच राहिले. तिचा हा व्हिडिओ आशिष सिंग या व्यक्तीने त्याच्या ट्विटर अकाउंटवर (Twitter account) शेअर केला आहे.
त्यात त्याने ‘बस करो रहम करो दिल्ली मेट्रो को…’ असे कॅप्शन दिले आहेत. तिचा हा व्हिडिओ चांगलाच व्हायरल होत असून या व्हिडिओला काही मिनिटांत लाखो व्ह्यूज मिळाले आहेत. यावर आता वापरकर्ते मजेशीर प्रतिक्रिया देत आहेत.
‘अर्धवटराव, मी काय म्हणालो, ते पूर्ण ऐकलेच नाही…, फडणवीसांची ठाकरेंवर जहरी टीका