झोप (Sleep) ही माणसाच्या आयुष्यतील महत्त्वपूर्ण बाब आहे. प्रत्येकाला ‘सुखाची झोप’ हवी असते. झोप व्यवस्थित झाली तर माणसाचे शारीरिक चक्र व्यवस्थित चालते. तसेच दुसऱ्या दिवशी कामासाठी उत्साह येतो व प्रसन्न वाटते. मात्र झोप पूर्ण न झाल्यास शरीरावर अनेक वाईट परिणाम होतात.
एलोन मस्क यांचे ट्विट चर्चेत; कुत्र्याचे फोटो टाकत माजी सीईओंना डिवचले
परंतु जगातील एक माणूस असा आहे की, जो सुमारे 61 वर्षे झोपलाच नाही. हा अजब माणूस व्हिएतनाम मध्ये राहतो. थाय एनजोक असे त्याचे नाव आहे. 80 वर्षांच्या या माणसाने दावा केला आहे की, मागील 61 वर्षे तो झोपलेला नाही.
थाय एनजोक यांना स्लीपलेस मॅन (Sleepless Man) म्हणून ओळखले जाते. लहानपणी थाय एनजोक यांना अचानक ताप आला होता. तेव्हापासून ते झोपलेले नाहीत. 1992 सालाची ही घटना आहे. तेव्हापासून थाय एनजोक हे झोपू शकले नाहीत. ते जागेच आहेत.
जितेंद्र आव्हाड यांच्या अडचणीत वाढ; महेश आहेर मारहाण प्रकरणी पोलिसांत गुन्हा दाखल
त्यांच्या आजूबाजूला असणाऱ्या लोकांनी देखील त्यांना कधी झोपताना पाहिलेले नाही. थाय एनजोक यांना निद्रानाश असल्याचे डॉक्टरांनी सांगितले आहे. विशेष म्हणजे न झोपता देखील एनजोक तंदरुस्त आहेत. न झोपण्याचा त्यांच्या शरीरावर काहीच परिणाम दिसत नाही.
शिंदे व भाजप समर्थकांमध्ये तुफान राडा! पोलिसांना करावा लागला हस्तक्षेप