
शेतकरी म्हंटल की मातीत घाम गाळणाऱ्या गरीब माणसाचे चित्र आपल्यासमोर उभे राहते. मात्र हिमाचल प्रदेश मधील एका गावातील शेतकऱ्यांची जीवनशैली वाचून तुम्हाला धक्काच बसेल. कारण, हे शेतकरी तुम्हाला विश्वासही बसणार नाही इतके आलिशान जीवन जगत आहेत. शिमल्यापासून 90 किमी दूर असणाऱ्या मडावग (Madawag, Shimla) या गावातील शेतकऱ्यांकडे आलिशान घरे व महागड्या गाड्या आहेत.
मोठी बातमी! अंगणवाडी सेविकांसाठी १२वी उत्तीर्णची अट
या गावातील 230 कुटुंबे मागील काही वर्षांपासून सफरचंदाची ( Apple Farming) लागवड करत आहेत. यातून त्यांना इतके उत्पन्न मिळाले आहे की, त्यांचे नशीबच अचानक पालटून गेले आहे. या गावात दरवर्षी 175 कोटी रुपयांच्या सफरचंदाची विक्री होते. त्यामुळे इथले लोक करोडपती ( Rich Village) झाले आहेत. या गावातील प्रत्येक कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न 35 ते 80 लाख इतके आहे. आशियामधील ‘सर्वात श्रीमंत गाव’ अशी या गावाची ओळख निर्माण होत आहे.
मोठी बातमी! उजनीचे पाणी आजपासून शेतीला सुटणार
मडावग या गावातील शेतकरी याआधी बटाट्याची शेती करायचे. मात्र, १९५३-५४ मध्ये गावातील छाया राम मेहता यांनी सफरचंदाची बाग लावली. यावेळी त्यांनी गावातील इतर लोकांनाही सफरचंद लागवडीसाठी प्रोत्साहन दिले. त्यानंतर गावातील इतर लोकांनी देखील ळूहळू सफरचंदाची लागवड करायला सुरुवात केली. याचा परिणाम असा झाला की, काही वर्षातच या गावातील सफरचंदाला संपूर्ण देशात ओळख मिळू लागली. या सफरचंदाचा दर्जा देखील उत्तम आहे.
ठाकरे गटाला पुन्हा एकदा गळती? आमदार खासदार शिंदे गटात प्रवेश करण्याच्या तयारीत