
भारतीय टेनिसपटू सानिया मिर्झाने (Saniaya Mirza) नुकतीच ग्रँडस्लॅममधून निवृत्त होण्याची घोषणा केली. यामुळे सध्या ती चांगलीच चर्चेत आहे. सानियाने तिच्या आतापर्यंतच्या कारकिर्दीत प्रचंड पैसे, मान-सन्मान मिळवला आहे. खरंतर हा काळ तिच्यासाठी फार सोप्पा न्हवता. अनेक वादांना व संकटांना तोंड देत सानिया इथपर्यंत पोहोचली आहे.
सानियाने आतापर्यंत सहा ग्रँडस्लॅम स्पर्धांमध्ये विजय मिळवला आहे. यामध्ये तीन सामने डबल्सचे, तर तीन सामने मिक्स डबल्सचे होते. इतकंच नाही तर 2016 मध्ये झालेल्या रिओ ऑलिम्पिकमध्ये सेमीफायनलिस्ट ठरली होती. 2015 ला झालेल्या वुमेन्स डबल्समध्ये देखकल ती जागतिक पातळीवर अव्वल खेळाडू ठरली होती.
वर्ल्डकप जिंकल्यानंतर ढसाढसा रडू लागली शेफाली वर्मा
वीस वर्षांपूर्वी म्हणजे 2003 मध्ये सानियाने तिच्या व्यावसायिक टेनिस करिअरला सुरुवात केली होती. दरम्यान या 2023 मध्ये ती टेनिस मधून निवृत्ती घेत आहे. सानिया मिर्झाने तिच्या टेनिस करिअरमध्ये सुमारे 58.65 कोटी रुपये फक्त बक्षिसातून मिळवले आहेत. याकाळात ती अनेक मोठ्या कंपन्यांची ब्रँड अँबेसेडर होती. तिची एकूण संपत्ती सुमारे 205 कोटी रुपये आहे.
गौतमीच मार्केट जाम केलं संध्याने! पाहा व्हायरल व्हिडीओ
सानियाच्या टेनिस ( Tenis) करिअरदरम्यान ती एअर इंडिया, टाटा टी, आदिदास, हॅथवे केबल, टीव्हीएस स्कूटी आणि विल्सनसारखे टॉप ब्रँड्स प्रमोट करत होती. तिच्याकडे अनेक नामांकित कंपनीच्या गाड्या देखील आहेत. आतापर्यंतच्या कारकिर्दीत सानियाला अनेक वादांना सामोरे जावे लागले.
धनुष्यबाण चिन्ह कोणाचे? आज लेखी युक्तीवादासाठीचा अखेरचा दिवस
पाकिस्तानची सून म्हणून तिला अनेकदा हिनवले गेले. मुस्लिम असून टेनिस खेळताना स्कर्ट घालते म्हणून धर्मगुरूंनी तिच्यावर टीका केली. टेबलावर पाय ठेऊन काढलेल्या एका फोटोत तिरंगा असल्याने देखील एकदा ती मोठ्या वादात अडकली होती.
चार हजार तलाठी भरती संदर्भात समोर आली मोठी अपडेट; वाचा सविस्तर