हिंदी चित्रपटसृष्टीतील दमदार अभिनेता सलमान खान हा त्याच्या हटके स्टाईल आणि अभिनयासाठी ओळखला जातो. ईदच्या शुभमुहूर्तावर बॉलीवूडचा दबंग अभिनेता सलमान खानने त्याच्या चाहत्यांसाठी एक मोठ गिफ्ट दिल आहे. सलमान खानचा ‘किसी का भाई किसी की जान’ हा चित्रपट २१ एप्रिलला रिलीज झाला आहे. आता सलमान खान विषयी एक मोठी बातमी समोर आली आहे.
अजित पवार यांना मोठा धक्का! राष्ट्रवादीच्या ‘या’ महत्वाच्या यादीतून वगळण्यात आले नाव
सलमान खान इंडस्ट्रीतील सर्वात मोठ्या सुपरस्टार पैकी एक असून भाईजान त्याच्या वैयक्तिक आयुष्यामुळे ही चर्चेत येत असतो. इतकच नाही तर सलमानला साध सिंपल राहणं आवडतं. पण तुम्हाला माहित आहे का? सलमान खान ‘किसी का भाई किसी की जान’ चित्रपटाच्या सेटवर फाटलेले बूट घालायचा. याचा खुलासा अभिनेत्री पलक तिवारी हिने केला आहे.
शरद पवार यांना मोठा धक्का; जवळच्या विश्वासू नेत्याची भाजपसोबत हात मिळवणी
अलीकडेच पलक तिवारीने माध्यमांशी संवाद साधताना सलमान खान विषयी एक मजेशीर किस्सा सांगितला आहे. ती म्हणाली, एकदा ‘किसी का भाई किसी की जान’च्या सेटवर मी सलमान खान सरांना फाटलेला बूट घातलेलं पाहिलं होतं. त्या बूटाला एक छिद्र पडलेलं होतं. यावेळी मी त्यांना विचारलं की, तुम्ही फाटलेला बूज का घातलाय?
शिव ठाकरे खतरोंके खिलाडी मध्ये दिसणार; सरावसुद्धा केला सुरू
यावेळी सलमान खान म्हणाला, मला हा फाटलेला बूट घातला की, एकदम कम्फर्टेबल वाटतो. म्हणून मी हा बूट घालतो. सलमान खानने दिलेलं हे उत्तर ऐकून पलक तिवारीला मोठा धक्काच बसला होता. इतका मोठा स्टार असताना तो चक्क फाटलेले बूट घालून फिरतो. पलक तिवारी हिने सांगितलेला हा किस्सा ऐकून सलमानच्या चाहत्यांमध्ये मोठी चर्चा रंगली आहे.
मराठा आरक्षणासाठी नवीन आयोग स्थापन करणार; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली मोठी घोषणा