
Royal Enfield । भारतीय बाजारात (Indian Market) अनेक बाईक्स (Bikes) लाँच होत असतात. परंतु आजही बाईकचा राजा म्हटले की बुलेटचे (Bullet) चित्र आपल्या डोळ्यासमोर उभे राहते. त्यामुळे दरवर्षी दुचाकी प्रेमींची मागणी आणि गरज पाहता वेगवेगळे फीचर्स आणि जबरदस्त मायलेज असणाऱ्या अनेक बुलेट लाँच होतात. अशातच आता दुचाकी प्रेमींमध्ये रॉयल एनफील्ड (Royal Enfield) बुलेटची मागणी झपाट्याने वाढली आहे. (Latest Marathi News)
उत्तर भारतात पावसाने घातले थैमान! जनजीवन विस्कळीत, 37 जणांचा मृत्यू
सध्या तर तरुणाईमध्ये या बुलेटची (Royal Enfield Bullet) जास्त क्रेझ आपल्याला पाहायला मिळत आहे. किमतीचा विचार केला तर तरुणांच्या हृदयावर राज्य करणारी ही बुलेट आज दीड ते दोन लाख रुपयांना विकली जात आहे. परंतु 30 ते 35 वर्षांपूर्वी या बुलेटची किंमत (Royal Enfield Bullet Price) इतकी नव्हती. जर तुम्ही 30 ते 35 वर्षांपूर्वीची किंमत जाणून घेतली तर तुम्हाला आश्चर्याचा धक्का बसल्याशिवाय राहणार नाही. तसेच या बुलेटचा इतिहास (Royal Enfield Bullet History) खूप रंजक आहे.
राष्ट्रवादीला मोठा धक्का बसणार? ‘हे’ तीन बडे नेते आगामी निवडणूक लढवणार नाहीत
सोशल मीडियावर सध्या रॉयल एनफिल्ड बुलेट 350cc या बाईकचे बिल चांगलेच व्हायरल होत आहे. 1986 साली ही बुलेट खरेदी केली आहे. जर तुम्ही हे बिल पाहिले तर तुम्हालाही आश्चर्याचा धक्का बसल्याशिवाय राहणार नाही. कारण या बुलेटची ऑन रोड किंमत 18,700 रुपये आहे. सर्वात महत्त्वाची बाबम्हणजे 1986 सालीच या बाईकला फक्त एनफिल्ड बुलेट असे म्हटले जात होते .
सर्वात मोठी बातमी! छगन भुजबळ यांना जीवे मारण्याची धमकी
रॉयल एनफिल्डची ही बुलेट 87 वर्षा अगोदर म्हणजे 1931 मध्ये बाजारपेठेत लॉन्च केली होती. त्यावेळी या बाईकचे नाव केवळ एनफिल्ड बुलेट असे होते. विशेष म्हणजे त्यावेळी भारतीय सेना या बाईकचा उपयोग सीमावर्ती भागामध्ये गस्त घालण्यासाठी करत होती.1931 यावर्षी ब्रिटनमध्ये ही लॉन्च केल्यानंतर वीस वर्षांनी म्हणजेच 1951 वर्षी ती भारतात लॉन्च केली. त्यावेळी ही बाईक दुचाकी प्रेमींची पहिली पसंती होती.
बुलढाणा अपघाताबाबत धक्कादायक खुलासा! जाणून घ्या अपघातावेळी नेमकं काय घडलं?