
आजकालच्या युगात कोणीही कोणाच्याही प्रेमात पडू शकतं. प्रेमात पडताना लोक ना वयाचा विचार करतात ना नात्यांचा. प्रेमात एकमेकांची फसवणूक झाल्याचे आपण सर्रास बघतो. पण घरातल्याच व्यक्तींनी फसवणूक केली तर ती फसवणूक जिव्हारी लागते . अशा घटना सोशल मीडियावर भरपूर व्हायरल होतात. दरम्यानच सोशल मीडियावर असाच एक व्हिडिओ खूप व्हायरल झाला आहे. त्या व्हिडिओमध्ये एका महिलेने तिच्या पतीच्या आणि आईच्या नात्याबद्दल अशा गोष्टींचा उलगडा केला आहे.
वडापावबाबत प्रसिद्ध अभिनेत्रीने केली खास पोस्ट; म्हणाली, “परदेशात वडापाव खाणे म्हणजे…”
व्हिडीओ पाहून तुमच्याही पायाखालची जमीनच सरकेल. तब्बल २२ वर्षांपासून तिच्या पतीचे अन् आईचे अफेअर चालू होते. परंतु तिला याबद्दल तिळमात्र माहिती नव्हती. पण डीएनए (DNA) चाचणी केल्यानंतर यांच्या अफेअरचा पर्दाफाश झाला.हे प्रकरण ब्रिटनमध्ये घडलं आहे. माहितीनुसार, त्या महिलेने तिच्या लहानपणीच्या प्रियकराशी लग्न केले होते. वयाच्या १८ व्या वर्षी प्रेग्नंट राहिल्यानंतर ती महिला त्याच्यासोबत तिच्या आई-वडिलांच्या घरी शिफ्ट झाली होती. त्या महिलेला तीन मुलं असून आता ती चौथ्या मुलाला जन्म देणार आहे.
पुणेकरांसाठी मोठी बातमी! ‘या’ कारणामुळे खड्डे नसतानाही JM रोड उकरला जाणार…
दरम्यान ती महिला तिच्या मित्रासोबत बाहेर फिरायला गेली होती. घरी आल्यावर ती बघते तर काय तिचा पती आणि आई दोघेही आक्षेपार्ह अवस्थेत होते. डीएनए किट घरी आणून त्या दोघांची तपासणी केली तेव्हा समजले की, महिलेचा पतीला आणि तिच्या जन्मदात्या आईला जुळी मुलं आहेत. “त्याने माझ्या आयुष्याची बरबादी केली, माझा विश्वास त्याने तोडला. माझ्या पतीवर माझा पूर्ण विश्वास आहे, त्यामुळे असं काही घडलं असं कधी वाटलंच नव्हतं. असं त्या महिलेचं म्हणनं आहे.
ब्रेकिंग! राज्यातील ‘या’ जिल्ह्यांमध्ये वादळी वाऱ्यांसह पावसाची शक्यता
या घटनेमुळे ती महिला तिच्या पती आणि आईपासून वेगळी झाली आहे. रिपोर्टनुसार, ४० वर्षीय महिलेने हे प्रकरण रेडिटवर शेअर केले आहे. तो व्हिडिओ बघून यूजर्स त्या व्हिडिओला वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत. बऱ्यापैकी लोक तिच्या पती आणि आईवर टीका करत आहेत.