सर्व जणांना असे वाटते की आपले शरीर निरोगी रहावे. त्यासाठी सर्वजण व्यायाम, योगा क्लास, जिम सुरू करतात. सर्वजण बॉडी बनवण्यासाठी प्रोटीन शेक खातात व जिम देखील सुरू करतात. दरम्यान सध्या ब्राझीलमधील एक १२ वर्षीय जिम बॉय चर्चेत आला आहे. ब्राझीलच्या १२ वर्षीय कॉजिन्हो नेटो याने जिम करून मोठ्या माणसांसारखी मसल बॉडी बनवली आहे. याचा व्हिडीओ देखील सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडिओला अनेक जण लाईक देखील करत आहेत.
सावधान! गूगल क्रोम वापरताय तर एकदा हे वाचाच…
सोशल मिडीयावर त्याने व्यायाम करतानाचे व्हिडीओ शेअर केले आहे. १२ वर्षीय मुलाचे मसल आणि अॅब्ज पाहून सर्वजण थक्क झाले आहेत. ह्या मुलाचे व्हिडिओ बघून मोठ्यांच्या देखील डोळ्यासमोर एक आदर्श उभा राहीला आहे अशी त्याची बॉडी आहे. नेटो हा ब्राझीलच्या साल्वाडोरचा रहिवासी आहे. नेटो दररोज सकाळी साडेपाच वाजता उठून पाच किलोमीटर धावतो. त्यानंतर सीट अप्सचा व्यायाम करतो. त्यानंतर तो शाळेत जातो. शाळेतून आल्यावर गृहपाठ पूर्ण करून पुन्हा दोन अडीच तास व्यायाम करतो.
माहितीनुसार, १२ वर्षीय नेटो ९१ किलोग्रॅम पेक्षा अधिक वजनासह डेडलिफ्ट करतो. नेटोला इंस्टाग्रामवर २ लाख ६९ लोक फॉलो करतात. यामध्ये तो डेडलिफ्ट, स्क्वॅट्स, बेंचप्रेस आणि बायसेप्स कर्ल यासारखे व्यायामाचे प्रकार करतो.२०२१ साली नेटोचे वडील नेटोला घेऊन जिमला गेले. त्यानंतर पंधरा दिवसांमध्येच तो व्यायाम शिकला. व्यायाम सुरू असतानाच त्याची १३सेंटीमीटर उंची देखील वाढली. व त्याने साल्वाडोरमधील वेटलिफ्टींग स्पर्धात भाग देखील घेतला होता.
मोठी बातमी! महाराष्ट्र भूषण पुरस्कार सोहळ्यात उष्माघातामुळे ११ जणांचा मृत्यु