देशातल्या श्रीमंत मंदिरांपैकी तिरुपती बालाजी देवस्थान एक आहे. अनेक भाविक भक्त देश विदेशातून दर्शनासाठी येत असतात. अनेक भाविक मंदिरासाठी मोठ्या प्रमाणात देणग्या देखील देतात. तिरुपती बालाजी मंदिराने (Tirupati Balaji Temple) शनिवारी राष्ट्रीयीकृत बँकांमध्ये 10.3 टन सोने आणि ₹15,938 कोटी रोख जमा केल्याची माहिती समोर आली आहे. हा आकडा ऐकुण सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला आहे.
कुंपणच शेत खात असेल तर विश्वास कुणावर ठेवायचा? चक्क स्वतःच्याच कॉलेजमध्ये प्राचार्यांनी केली चोरी!
मंदिराची एकूण संपत्ती 2.26 लाख कोटी ($27.56 अब्ज) एवढी आहे. यामुळे तिरूपती बालाजी देवस्थान जगातील सर्वांत श्रीमंत मंदिर म्हणून ओळखले जाते. हे मंदिर दक्षिण भारतामधील आंध्र प्रदेश राज्यातील हिंदू देव विष्णूला समर्पित आहे.
“गुटखा खा, दारू प्या,आयोडेक्स खा पण…”; भाजपा नेत्याचं वक्तव्य चर्चेत
या मंदिरात खूप लांबून लांबून भाविक भक्त दर्शन घेण्यासाठी येत असतात. बरेच लोक या ठिकाणी मोठमोठी देणगी देखील देत असतात. माहितीनुसार, “2019 मध्ये विविध बँकांमधील मुदत ठेवींमध्ये या देवस्थानची गुंतवणूक 13,025 कोटी रुपये होती, जी आता 15,938 कोटी रुपये झाली आहे. मागच्या तीन वर्षांमध्ये, गुंतवणुकीत ₹2,900 कोटी एवढी वाढ झालेली पाहायला मिळत आहे.
पीएम किसान योजनेत झाला मोठा बदल; लवकरच जमा करावी लागणार ‘ही’ कागदपत्रे…अन्यथा पैसे मिळणार नाहीत