Gautami Patil: गौतमी पाटीलच्या एका शोचं मानधन ऐकून व्हाल थक्क; वाचा सविस्तर

You will be shocked to hear the remuneration of one of Gautami Patil's shows; Read in detail

लावणी कलाकार गौतमी पाटील (Gautami Patil) मागील काही दिवसांपासून वादाच्या भोवऱ्यात अडकली आहे. एका सांस्कृतिक कार्यक्रमादरम्यान अंगावर पाणी ओतून, अश्लील हावभाव करून नाचताना गौतमीचा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला होता. यावरून सुरु झालेला वाद मिटण्याआधीच नुकत्याच तिच्या लावणी कार्यक्रमात चेंगराचेंगरी होऊन एका व्यक्तीचा संशयास्पद मृत्यू झाला.

राष्ट्रवादीला मोठा धक्का! अजित पवार नाराज?

या घटनांमुळे चर्चेत आलेली गौतमी पाटील ही मूळची धुळे येथील असून ती अवघ्या 26 वर्षांची आहे. घरच्या हालाखीच्या परिस्थितीमुळे तिने लावणी क्षेत्रात पाऊल ठेवले. पत्रकार परिषदेत माहिती देताना गौतमी पाटील हिने याबद्दल सांगितले असून यावेळी तिने तिची घरची परिस्थिती कथन केली आहे.

नागरिकांना आता घरुनही मतदान करता येणार! इतिहासात पहिल्यांदाच घरून मतदानाचा उपक्रम यशस्वी…

गौतमीच्या जन्मापूर्वीच तिचे आई वडील वेगळे झाले होते. तिच्या वडिलांनी काही कारणांमुळे तिच्या आईला नववा महिना सुरू असतानाच सोडून दिले. गौतमीच्या जन्मानंतर तिच्या आईने जॉब केला. बिसलेरी आणि इतर काही कंपन्यांमध्ये काम केलं. मात्र गौतमीचे शिक्षण सुरू असतानाच तिच्या आईचा अपघात झाला. यामुळे आईचे काम सुटले. परिणामतः गौतमीला शिक्षण सोडावे लागले.

‘ये रिश्ता क्या कहलता है’ मधील अभिनेत्याने अफेअरच्या चर्चांवर केला मोठा खुलासा; म्हणाला “चारू असोपा आणि मी…”

यामुळे गौतमीने पैसे कमावण्यासाठी ऑर्केस्ट्रामध्ये काम सुरू केले. महेंद्र बनसुळे सर यांच्याकडे ती कामाला होती. नंतर, अकलूज लावणी महोत्सवात गौतमीने बॅक डान्सर म्हणून काम केले तेव्हा तिला ५०० रुपये मानधन मिळाले होते. आता शो साठी हजारो रुपयांचे मानधन घेत असल्याचे देखील गौतमीने सांगितले आहे.

धक्कादायक! पोहायला गेलेल्या दोन तरुणांचा बुडून मृत्यू; वाचा सविस्तर

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *