Site icon e लोकहित | Marathi News

वयाच्या साठीमध्ये प्रेयसीबरोबर दूर जाऊन राहण्यासाठी केले हे ‘कृत्य’, वाचून तुम्हालाही बसेल धक्का!

You will be shocked to read this 'deed' done to stay away from your lover at the age of sixty!

प्रेमसंबंधातून होणाऱ्या चुकीच्या घटना आपण बऱ्याचदा आपल्या आजूबाजूला पाहत असतो. पुणे जिल्ह्यातील आळंदी येथे अशीच एक हादरवून टाकणारी घटना घडली आहे. येथील एका व्यक्तीने प्रेयसीसोबत ( Girlfried) दूर कुठेतरी जाऊन राहण्यासाठी स्वतःच्याच खुनाचा बनाव केला. धक्कादायक गोष्ट म्हणजे यासाठी दुसऱ्या व्यक्तीचे शीर धडावेगळे केले आहे. इतकंच नाही तर स्वतःचे कपडे घालून मृतदेह पुन्हा रोटर मशीनमध्ये फिरवून निर्घृण खून केला आहे.

रानूला मिळाला कानू! सोशल मीडियावर राणू मंडलचा ‘या’ मुलासोबतचा व्हिडीओ होतोय व्हायरल

सुभाष थोरवे असे आरोपीचे नाव असून नुकतेच पोलिसांकडून त्यांना अटक करण्यात आली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सुभाष थोरवे याचे एका महिलेसोबत प्रेमसंबंध ( Love relationship) होते. दरम्यान थोरवे यांना त्यांच्या प्रेयसीसोबत दूर कोठे तरी जाऊन रहायचे होते. यामुळे त्यांनी स्वतःच्याच मृत्यूचा बनाव केला. यासाठी त्यांनी आपल्या प्रेयसीसोबत मिळून मृत रविंद्र घेनंद यांना विश्वासात घेऊन आपल्या शेतात बोलावले.

खूण करून तरुण फरार; परंतु पोलिसांनी शेवटी हिसका दाखवलाच!

रविंद्र घेनंद शेतात आल्यानंतर कोयत्याने त्यांचे मुंडके कापून थोरवे यांनी मृतदेहाच्या अंगावर स्वतःचे कपडे घातले. यानंतर शेतातील रोटर मशीनमध्ये मृतदेह घालून तो फिरवला व हा अपघात असल्याचा बनाव थोरात यांनी केला. इथेच न थांबता खबरदारी घेत थोरवे यांनी मृतदेहाचे मुंडके, कोयता व अंगावरचे कपडे लपवून ठेवत पुरावा नष्ट केले. परंतु, या साऱ्या प्रकरणात शंका घेण्यासारखे अनेक मुद्दे होते. यामुळे आळंदी ( Aalandi) पोलिसांनी याबाबत आकस्मिक मृत्यूची नोंद न करता तपास केला. तपासात संशयित सुभाष थोरवे शेलपिंपलगाव येथे जिवंत आढळून आले. यावेळी पोलिसांनी थोरवे यांना ताब्यात घेतले. आश्चर्याची गोष्ट म्हणजे थोरवे यांनी वयाच्या 65 व्या वर्षी प्रेयसीसाठी हे कृत्य केले आहे.

आजच ही दोन कामे करून टाका! अन्यथा पीएम किसान योजनेचा 13 व्या हप्ता मिळणार नाही

Spread the love
Exit mobile version