आतापर्यंत आपण सर्वांनी लाल रंगाचे सफरचंद पाहिले होते. परंतु सध्या मार्केटमध्ये काळ्या रंगाचे सफरचंद (Black apple ) देखील आले आहे. या काळ्या सफरचंदाचे उत्पादन (Apple production) हे तुरळक प्रमाणात घेतले जाते. यामुळे हे सफरचंद बाजारामध्ये कमी प्रमाणात पहायला मिळत. तसेच काळ्या रंगाच्या सफरचंदामुळे शरीराला पोषकत्वांचा पुरवठा होतो. काळ्या सफरचंदामध्ये अँटी-बॅक्टेरिअल हे घटक मोठ्या प्रमाणात असतात. व यामुळे शरीराचे बॅक्टेरिया पासून संरक्षण होते.
लग्न घटिका समीप आली पण, नवरी मंडपातून बेपत्ता; ‘त्या’ 20 मिनिटात नेमकं काय घडलं?
काळ्या सफरचंदाचे उत्पादन हे खूप कमी प्रमाणात घेतल्यामुळे हे फळ खूप महाग आहे. काळ्या वांग्याप्रमाणे हे सफरचंद दिसते. व या काळ्या सफरचंदाची चव देखील इतर सफरचंदांपेक्षा वेगळी असते. म्हणूनच या सफरचंदाला ‘ब्लॅक डायमंड’ ( Black Diamond ) असे देखील म्हटले जाते. कोलेस्टोरची पातळी समतोल राहते व हाडे मजबूत करण्यास देखील काळा सफरचंद मदत करतो.युनायटेड स्टेट डिपार्टमेंट ऑफ अॅग्रीकल्चर ( United States Department of Agriculture ) यांच्या माहितीनुसार काळ्या सफरचंदामध्ये ‘विटामिन ए’ जास्त प्रमाणात असते.
Crime | १६ वर्षीय मुलीची निर्दयीपणे हत्या; ९० सेकंदात केला खेळ खल्लास
काळा सफरचंद खाल्ल्याने डोळ्यांचा आजार देखील नियंत्रित होतो. व डोळ्यांची दृष्टी सुधारण्यास मदत होते. शरीराची झीज भरून काढण्यासाठी काळा सफरचंद आहारात घेतला जातो. काळ्या सफरचंदामध्ये कॅलरीज भरपूर प्रमाणात असल्यामुळे पुरेशा प्रमाणात ऊर्जा मिळते. काळ्या सफरचंदामध्ये रोगप्रतिकार क्षमता वाढवणारे घटक जास्त आहे. तसेच शरीराच्या गंभीर आजारापासून सुटका मिळण्यास देखील काळा सफरचंद मदत करतो.
IPL 2023 Winner | आयपीएलचा अंतिम सामना पार पडला! चेन्नई सुपर किंग्जकडे पाचव्यांदा विजेतेपद…