
एमपीएससीच्या विद्यार्थ्यांनी पुण्यातील अलका टॉकीज या भागात आज आंदोलनाला सुरवात केली होती. एमपीएससीच्या नवीन अभ्यासक्रमावरून विद्यार्थी रस्त्यावर उतरले होते. नवीन अभ्यासक्रम २०२३ पासून लागू न करता २०२५ पासून लागू करावा. अशी विद्यार्थ्यांची मागणी होती.
“कोण बागेश्वर बाबा? संत तुकाराम महाराजांबद्दलच्या आक्षेपार्ह विधानावर अजित पवार आक्रमक
या आंदोलनामध्ये गोपीचंद पडळकर यांनी सहभाग घेत विद्यार्थ्यांना पाठिंबा दर्शविला होता. गोपीचंद पडळकर यांच्यामार्फत MPSC करणाऱ्या विद्यार्थ्यांची ही मागणी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnvis) यांच्यापर्यंत पोहचवण्यात आली होती. यानंतर मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय झाला असून नवीन अभ्यासक्रम २०२५ पासून लागू करण्यात येणार आहे.
काय आहे अदानींचा घोटाळा? एवढा मोठा घोटाळा त्यांनी केला कसा? वाचा याबद्दल सविस्तर माहिती
दरम्यान, सरकारच्या या निर्णयावर विद्यार्थ्यांकडून आनंदोत्सव साजरा केला जातोय. पुण्यायामध्ये विद्यार्थ्यांनी गोपीचंद पडळकर यांना उचलून घेत त्यांच्या नावाचा जयजयकार केला आहे. यांनतर पडळकर यांनी भाषण देखील केले. यावेळी भाषणात बोलताना ते म्हणाले, “मुलींना सोमवारचे उपवास करून चांगला नवरा मिळू शकतो मात्र मुलांनो तुम्हाला उपवास करून देखील चांगली बायको मिळणार नाही.” यासाठी तुम्हाला MPSC परिक्षा पास व्हावंच लागेल. असे गोपीचंद पडळकर यावेळी बोलताना म्हणाले आहेत.
दोन विद्यार्थिनींनी मिळून केली ऐकिला बेदम मारहाण; पाहा व्हायरल VIDEO